Monday, December 22, 2025
Home बॉलीवूड ‘पठाण’च्या सेटवरून दीपिका आणि शाहरुखचे नवे फोटो व्हायरल, फोटो पाहून वाढवली चाहत्यांची उत्सुकता

‘पठाण’च्या सेटवरून दीपिका आणि शाहरुखचे नवे फोटो व्हायरल, फोटो पाहून वाढवली चाहत्यांची उत्सुकता

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान(Shah rukh Khan) त्याच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. या फोटोजमुळे चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. शाहरुख तब्बल 3 वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने प्रेक्षक चांगलेच उत्सुक होते. त्यानंतर काही महिन्यांनी ‘पठाण’ची घोषणा करण्यात आली आणि अधिकृतरित्या जॉन अब्राहम, दीपिका पदूकोण(Deepika Padukone) आणि शाहरुख खान यांच्या पात्रांची पुसटशी ओळख करून देण्यात आली.

‘पठाण’मध्ये शाहरुख खानसोबत अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम दिसणार आहेत. या तिघांचा फर्स्ट लुक यापूर्वीच समोर आला आहे. त्याचवेळी, आता सेटवरून एक फोटो समोर आले आहे, जे पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि शाहरुख त्यांच्या चित्रपटाच्या लूकमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावर या फोटोची चांगलीच चर्चा होत आहे. फिल्मफेअरच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघे बाल्कनीत एकत्र उभे असल्याचे दिसत आहे. एकीकडे शाहरुख निळ्या शर्ट आणि जीन्समध्ये डॅशिंग लुक दाखवत आहे, तर दुसरीकडे दीपिका ऑफ-शोल्डर व्हाइट क्रॉप टॉप आणि केशरी रंगाच्या थाई-हाय स्लिट स्कर्टमध्ये अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. या फोटोमध्ये शाहरुख शांतपणे उभा दिसत आहे, तर दीपिका ग्लासमधून काहीतरी पिताना दिसत आहे. सोशल मिडियावर तर याची चांगलीच चर्चा सुरू आहे. नेटीजन्सनी तर ‘पठाण टीझर’ हा हॅशटॅगसुद्धा ट्रेंड करायला सुरुवात केली आहे.

हे चित्र सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्याचवेळी चाहते ‘पठाण’बद्दल अधिक उत्सुक दिसत आहेत. या फोटोखाली कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “किंग येत आहे.” दुसर्‍या नेटकऱ्यांनी “खूप उत्सूक आहे” अशी केमेंट केल्या आहे. त्याचवेळी, आणखी एका व्यक्तीने लिहिले की, “वादळ येत आहे.” शाहरुख खान त्याच्या चित्रपटासोबतच त्याच्या वाढदिवसानिमित्तही सध्या खूप चर्चेत आहे. 2 ऑक्टोबरला किंग खान त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बिनधास्त गर्ल! सई ताम्हणकरचा सोज्वळ लुक होतोय व्हायरल…

18 वर्षांच्या संघर्षानंतर ‘कांतारा’चा अभिनेता कसा बनला सुपरस्टार? जाणून घ्या एका क्लिकवर

हे देखील वाचा