×

…म्हणून दीपिका पदूकोणने सलमान खानसोबत काम करण्यास दिलेला नकार? स्वत: केला खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी स्वतःला सतत कामात व्यस्त ठेवते. त्यासह ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. ती तिच्या जबरदस्त स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते. दीपिका ही त्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी वेगवेगळ्या पात्रांद्वारे लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २००५ मध्ये ती पहिल्यांदा हिमेश रेशमियाच्या (Himesh Reshmiyaa) ‘नाम है तेरा’ म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. या म्युझिक व्हिडिओनंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि २००७ मध्ये शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दिसली. पण तुम्हाला माहित आहे का की, बॉलिवूडमधली पहिली ऑफर दीपिकाला सलमान खानने (Salman Khan) दिली होती, जी तिने नाकारली. आता तिनेच या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

दीपिका पदुकोणने उघड केले अनेक वर्षांचे रहस्य
खुद्द दीपिका पदुकोणने अनेक वर्षांनंतर याचा खुलासा केला आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत तिने याचा उल्लेख केला आणि सलमान खानला नाही म्हणण्याचे कारण काय होते ते सांगितले.

क्षमता पाहून जेव्हा सलमानने निवडले दीपिकाचे नाव
दीपिका म्हणाली की, “माझे आणि सलमानचे समीकरण नेहमीच सुंदर राहिले आहे. मी त्याची नेहमीच ऋणी राहीन कारण त्यानेच मला माझा पहिला चित्रपट ऑफर केला होता. त्यावेळी मी नुकतेच मॉडेलिंग सुरू केले होते आणि माझ्यासोबत काम केलेल्या कोणीतरी त्याला माझे नाव सुचवले. जेव्हा मला स्वतःला त्याबद्दल माहितीही नव्हती तेव्हा त्याने माझ्यातील क्षमता पाहिली.”

‘यामुळे’ दीपिकाने सलमानला दिला नकार
दीपिकाने सांगितले की, ”त्यावेळी मला अभिनय आणि चित्रपटांमध्ये रस नव्हता आणि अभिनय अजिबात करायचा नव्हता, म्हणून मी सलमानच्या चित्रपटाला नाही म्हटले. मात्र, दोन वर्षांनी मला ‘ओम शांती ओम’ मिळाला आणि तोपर्यंत माझे मत बदलले होते आणि मी चित्रपटाला होकार दिला.”

दीपिकाला आशा आहे की, एक दिवस ती सलमान खानसोबत नक्कीच काम करेल. दीपिका आणि सलमानला एका प्रोजेक्टमध्ये एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र, अद्याप तसे झालेले नाही.

दीपिका पदुकोणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर जवळपास सहा वर्षे डेटिंग केल्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगशी (Ranveer Singh) २०१८ साली लग्न केले. या जोडीने ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ आणि ‘पद्मावत’ सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. ब्लॉकबस्टर चित्रपट ‘८३’ हा लग्नानंतरचा पहिला एकत्र चित्रपट आहे.

हेही वाचा :

Latest Post