Thursday, November 30, 2023

‘या’ अभिनेत्रीसोबत राजेश खन्नांना करायचे होते लग्न, नाते तुटल्यावर घरासमोरून काढली वरात

हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिले सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. लोक त्यांचे वेडे असायचे. राजेश खन्ना यांचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. परंतु असे म्हटले जाते की, राजेश खन्ना ज्यांच्या प्रेमात पडले ती अभिनेत्री अंजू महेंद्रू (Anju Mahendru) होती.

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू
चित्रपट अभिनेत्री असण्यासोबतच अंजू महेंद्रू फॅशन डिझायनर आणि मॉडेल देखील होत्या. राजेश खन्ना आणि अंजू महेंद्रू यांची पहिली भेट कशी झाली याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. दोघंही एकमेकांवर मनापासून प्रेम करत असल्याची चर्चा सर्रास होत होती. त्या काळात अंजू एकीकडे तिची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत होती, तर दुसरीकडे राजेश खन्ना सुपरस्टार बनले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांना खूप सपोर्ट करत होते. (untold love story of super star rajesh khanna and actress anju mahendru)

अंजूसोबत ब्रेकअप
राजेश खन्ना पूर्ण सात वर्षे अंजू महेंद्रूसोबत राहिले. राजेशला अंजूशी लग्न करायचे होते. अंजूच्या आईचीही इच्छा होती की राजेश खन्ना यांनी अंजू महेंद्रूशी लग्न करावे, परंतु अंजूने वारंवार नकार दिल्याने, दोघांचेही लग्न होऊ शकले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंजू महेंद्रूचे नाव त्यावेळी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर गॅरी सोबर्ससोबत जोडले जाऊ लागले होते.

क्रिकेटरसोबतच्या अफेअरच्या बातम्यांनंतर राजेश खन्ना यांनी तिच्यासोबतचे नाते पूर्णपणे संपवले. यानंतर राजेश खन्ना यांनी १०७३ मध्ये चित्रपट अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत (Dimple Kapadia) लग्न केले. त्यांनी अंजूच्या घरासमोरून लग्नाची वरात काढली, यावरून राजेश खन्ना यांच्या संतापाचा अंदाज लावता येतो. 18 वर्षांपासून दोघांमध्ये कोणतंही संभाषण झालं नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र, 2012 मध्ये राजेश खान यांचे निधन झाले तेव्हा शेवटच्या क्षणीही अंजू त्यांच्यासोबत होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ अभिनेत्याने उडवली होती राजेश खन्ना यांची झोप, 100 चित्रपट करूनही मिळाले नाही यश
जेव्हा राजेश खन्ना अन् शबाना आझमी करत होते रोमान्स, तेव्हा कादर खान आरके स्टुडिओत बसून…

हे देखील वाचा