हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘पहिले सुपरस्टार’ राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी सत्तरच्या दशकात आपल्या प्रचंड मेहनतीने आणि अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवले आहे. आजही अनेक चाहते त्यांच्या चित्रपटांवरील किस्से शेअर करत असतात. अभिनेते राजेश यांच्या अभिनयावर फक्त चाहतेच नाही, तर अनेक अभिनेत्रीही फिदा होत्या. त्या काळात राजेश खन्नांसोबत काम करण म्हणजे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासारखे असायचे. त्यांच्या अनेक चित्रपटांनी यशाचा इतिहासच घडवला आहे. त्यांनी स्वतःसोबत अनेक अभिनेत्रींना यशाच्या शिखरावर नेले होते.
दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी (shabana azami) यांना राजेश यांच्यासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा होती. शबाना आझमी ‘आर्ट’ चित्रपटांमुळे खूप प्रसिद्ध झाल्या होती. परंतु यानंतर राजेश खन्ना यांच्यासोबतचा ‘नसीहत’ या चित्रपटातील शबाना आझमी यांचा ग्लॅमरस लूक पाहून तुम्हीही हैराण व्हाल. राजेश आणि शबाना यांनी ‘अमरदीप’, ‘अवतार’, ‘अशांत’, ‘थोडी सी बेवफाई’ आणि ‘नसीहत’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असले, तरीही ‘नसीहत’मध्ये दोघांची जोडी जबरदस्त गाजली होती. शबाना यांनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी एक रोचक किस्सा सांगितला होता.
‘नसीहत’ चित्रपट तब्बल ४वर्षीनी प्रदर्शित झाला
प्रसिद्ध दिग्दर्शक अरविंद सेन यांचा ‘नसीहत’ चित्रपट 1986साली प्रदर्शित झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट 1982 साली बनवण्यात आला, पण तो 4वर्षांनी प्रदर्शित झाला. जेव्हा चित्रपट चित्रपटगृहात पोहोचला, तेव्हा प्रचंड हिट झाला. या चित्रपटाने सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले. दरम्यान, प्रत्येक चित्रपट निर्मितीशी संबंधित अनेक आंबट आणि गोड आठवणी आहेत, अशाच काही आठवणी शबाना यांनी शेअर केल्या होत्या.
तंत्रज्ञानाने चित्रपट बनवणे केले सोपे
आज जरी तंत्रज्ञानाची प्रगत झाली असली, तरी जुन्या काळात चित्रपट शूट करणे सोपे नव्हते. आजच्या युगात चित्रपटाचे शूटिंग असो किंवा गाण्यांचे रेकॉर्डिंग, तंत्रज्ञान प्रत्येकामध्ये आश्चर्यकारक आहे. पूर्वी अभिनेत्यांसह, चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना खूप कष्ट घ्यावे लागायचे, त्यानंतर एक चित्रपट तयार केला जायचा. शबाना आझमी यांनीही अशीच एक कथा सांगितली होती.
राजेश आणि शबाना यांनी शूटिंग करत असताना कादर खान यांनी लिहिली स्क्रिप्ट
शबाना आझमी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “आता चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी योग्य कॉल शिट्स आहेत, पण पूर्वीच्या काळात तसे नव्हते. मला आठवते जेव्हा राजेश खन्ना आणि मी अरविंद सेनच्या ‘नसीहत’ चित्रपटासाठी खारमध्ये एकत्र शूट करत होतो, तेव्हा कादर खान आरके स्टुडिओमध्ये बसून पुढचा सीन लिहित असत आणि दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंगही करत असत. चित्रपटाची सत्यता सांभाळू शकलो हे एका आमच्यासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही.”
राजेश खन्ना आणि शबाना आझमी व्यतिरिक्त, ‘नसीहत’मध्ये कादर खान, मिथुन चक्रवर्ती आणि दीप्ती नवल यांच्याही भूमिका होत्या. या चित्रपटातील ‘झनक-झनक झांझर बाजे’, ‘मेरा मन देखे सपना’, ‘तेरे मेरे प्यार की कुंडली’ ही गाणीही खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला प्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आणि आनंदजी यांनी संगीत दिले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही नक्की वाचा-
दिग्दर्शकाच्या ‘त्या’ एका निर्णयाने मोडली होती राजेश खन्ना आणि अमोल पालेकरांची जुनी मैत्री, वाचा सविस्तर
फ्लॉप अभिनेत्री ठरवूनही ट्विंकल खन्ना आहे कोट्याधीश, ‘या’ व्यवसायातून मिळतो तिला बक्कळ पैसा