सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा सामान्य व्यक्तींपासून ते मोठ मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वजण वापर करतात. सिनेजगतातील कलाकार मंडळींना त्यांच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी तर हे सर्वात मोठं व्यासपीठ असतं. तसेच, प्रत्येक गोष्टीवर नजर ठेऊन असणारे राज्य पोलीस खात्याचेही ट्विटर अकाऊंट आहेत. अशामध्ये जर एखाद्याकडून चुकीचा संदेश जात असेल, तर त्याला वेळीस आळा घालतात. तसेच, अनेकदा त्यांचा मजेशीर अंदाजही पाहायला मिळतो. असेच काहीसे आताही घडले आहे.
‘एक व्हिलन रिटर्न्स‘ (Ek Villain Returns) हा सिनेमा लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जॉन अब्राहम, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया ही अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. तसेच, या सिनेमात जबरदस्त ऍक्शनसोबतच सस्पेन्सही असणार आहे. हे सर्व पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अशातच सिनेमातचे एक पोस्टर शेअर करत यूपी पोलिसांनी एक ट्वीट (Up Police Tweet) केले. यानंतर हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे.
‘एक व्हिलन रिटर्न्स’ या सिनेमाबाबत यूपी पोलिसांनी ट्वीट का केले आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. चला तर जाणून घेऊया काय आहे या ट्वीटमागील कारण…
झाले असे की, सिनेमा आणि सिनेमाच्या गाण्यांबद्दल मजेशीर अंदाजात नेहमीच ट्वीट करणाऱ्या यूपी पोलिसांनी नुकतेच एक ट्वीट केले. यामध्ये त्यांनी मजेशीर अंदाजात त्यांनी सिनेमामार्फत जे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, तेदेखील सांगितले आहे. यूपी पोलिसांनी सिनेमाचे पोस्टर शेअर करत ट्वीट केले की, “कोणाचेही व्हिलन बनू नका. कारण, गुन्ह्याची पुढची पायरी तुरुंग आहे. तुमची गल्ली सुरक्षित करण्यासाठी ११२ वर फोन करा. #NoVillainReturns.”
‘Ek Tha Villain’
Going beyond the call of duty everyday, the #HeroesOfUPP ensure citizens safety & hunt down villains one by one.#NoVillainReturns pic.twitter.com/OI9uFvJ4aG
— UP POLICE (@Uppolice) July 5, 2022
यूपी पोलिसांकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये मुखवट्याच्या एका बाजूला जॉन अब्राहम आहे आणि दुसऱ्या बाजूला दिशा पटानी आहे. पोस्टरवर असे लिहिले आहे की, “खात्री करून घ्या की, कोणताही व्हिलन परत येणार नाही.”
सोशल मीडियावर यूपी पोलिसांचे ट्वीट तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या मजेशीर ट्वीटसोबत सोशल मीडियावर युजर्स त्यांच्या विनोदबुद्धीची प्रशंसा करत आहेत. त्यांनी ज्याप्रकारे व्हिलन्सना चेतावणी दिलीये, त्याची नेटकरी प्रशंसा करत आहेत.
‘एक व्हिलन रिटर्न्स’ हा सिनेमा या महिन्यात म्हणजेच २९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये सस्पेन्स ठासून भरलेला आहे. खरं तर, ट्रेलर पाहून समजत नाहीये की, यावेळी व्हिलन कोण असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लव्ह मॅरेज करण्याचा विचार करताय? जरा थांबा आणि बघा अभिनेता राजकुमार रावची अवस्था
सुरुवातीला खाल्ला खस्ता, पण मेहनतीच्या जोरावर बनला ‘एनर्जेटिक’ अभिनेता, वर्षाला छापतो ‘इतके’ कोटी