Monday, March 2, 2026
Home बॉलीवूड पाहायला विसरू नका 2023मध्ये येणारे ‘हे’ ऐतिहासिक सिनेमे

पाहायला विसरू नका 2023मध्ये येणारे ‘हे’ ऐतिहासिक सिनेमे

अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे बनवले जातात. असेच बिग बजेट ऐतिहासिक सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यातीलच हे आहेत 2023मध्ये येणारे काही ऐतिहासिक सिनेमे

आदिपुरुष
12 जानेवारी 2023 रोजी ‘आदिपुरुष’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास हा राम, सैफ अली खान हा रावण, क्रिती सेनन ही सीता आणि देवदत्त नागे हा हनुमानाच्या भूमिकेत आहेत. रामायणावर आधारीत या चित्रपटाची कथा भाष्य करते.

द गुड महाराजा
‘द गुड महाराजा’ सिनेमाचे बजेट 400 कोटी आहे. दुसऱ्या महायुद्धात तत्कालीन सोव्हिएत रशियापासून सुटका केलेल्या 1000 पोलिस मुलांना जामनगरचे महाराजा दिग्विजय सिंग आणि रणजित सिंग जडेजा यांनी बालाचडी येथे मदत केली होती या कथेवर आधारीत हा सिनेमा आहे. विकास वर्मा ‘द गुड महाराजा’ सिनेमाचे निर्माते आहेत. या सिनेमात संजय दत्त मुख्य भूमिकेत आपल्याला दिसेल.

द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव
1818मध्ये झालेल्या दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटीश सैनिकांदरम्यान युद्धावर आधारीत हा चित्रपट आहे. हे युद्ध भीमा कोरेगावची लढाई या नावानं प्रसिद्ध आहे. या सिनेमात अर्जुन रामपालसोबत अभिनेत्री सनी लिओनी, अभिमन्यू सिंह हे देखील दिसणार आहेत. रमेश थेटे दिग्दर्शित हा चित्रपट मार्च 2023मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘तु वेडी आहेस का?’ सारा अली खानच्या जोकवर भडकला रितेश देखमुख,पाहा व्हायरल व्हिडिओ
कमाईत भल्याभल्यांना मागे टाकणाऱ्या ‘युट्यूबचा बादशाह’ भुवन बामची नेट वर्थ आहे तरी किती? जाणून घ्याच

हे देखील वाचा