Friday, July 5, 2024

ओटीटीवर प्रदर्शित होणारे ‘हे’ चित्रपट आणि वेबसिरीज करणार येणारा आठवडा अधिक रंगतदार

सध्या सिनेमागृहात एकापाठोपाठ एक धमाकेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे बंद पडलेली सिनेमागृहे पुन्हा एकदा प्रेक्षकांनी भरुन गेली आहेत. अनेक नाविण्यपूर्ण कथांवर चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘केजीएफ चॅप्टर २‘ सिनेमागृहात धुमाकूळ घालत असतानाच ओटीटीवरही अनेक वेबसिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. बीस्ट’, ‘आरआरआर‘ आणि ‘केजीएफ 2’ सारखे अनेक मोठे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले आहेत. या संपूर्ण आठवड्यात हे चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. तर ओटीटीवरही प्रेक्षकांच्या भेटीला धमाकेदार वेबसिरीज येणार आहेत. कोणते आहेत ते चित्रपट आणि वेबसिरीज चला जाणून घेऊ. 

लंडन फाइल्स – अर्जुन रामपालचा ‘लंडन फाइल्स’ २१ एप्रिल २०२२ रोजी रिलीज होत आहे. ही वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्म ‘वूट’वर प्रदर्शित होणार आहे. ‘लंडन फाईल्स’ ही एक थरार असणारी वेबसिरीज आहे. ज्यामध्ये अर्जुन रामपाल लंडन शहरातील हरवलेल्या व्यक्तीच्या प्रकरणाचा तपास करताना दिसणार आहे.

गिल्टी माइंड्स – दिग्दर्शिका शेफाली भूषण यांचा ‘गिल्टी माइंड्स’ हा चित्रपट २२ एप्रिलपासून प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. ही वकिलीवर आधारित सिरीज आहे. यात श्रिया पिळगावकर, वरुण मित्रा, नम्रता सेठ, सुगंधा गर्ग, कुलभूषण खरबंदा, सतीश कौशिक, बेंजामिन गिलानी, वीरेंद्र शर्मा, दीक्षा जुनेजा, प्रणय पचौरी, दीपक कालरा आणि चित्रांगदा सतरूपा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दोन तरुण आणि इच्छुक वकिलांचा प्रवास यामध्ये दाखवला आहे.

ओह माय गॉड – सरोव षणमुगम दिग्दर्शित ‘ओह माय डॉग’ हा चित्रपट २१ एप्रिल २०२२ रोजी OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा कुत्रा आणि त्याचा मालक यांच्याभोवती फिरताना दिसणार आहे. प्राणीप्रेमींना हा चित्रपट खूप आवडेल. या चित्रपटात अरुण विजयसोबत अर्णव विजय, विजयकुमार, महिमा नांबियार, विनोदिनी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

‘रशियन डॉल २’ – रशियन डॉल सीझन २ पुन्हा एकदा तुमचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. ही अमेरिकन विनोदी वेबसिरीज २० एप्रिल २०२२ रोजी Netflix वर प्रदर्शित होत आहे. या सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यामुळे प्रेक्षकांनाही पुढच्या पर्वाची आतुरता लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा