Thursday, October 16, 2025
Home बॉलीवूड ‘मेट्रो इन दिनो’च्या पहिल्या गाण्याचा टीझर आला समोर; १८ वर्षांनी पुन्हा प्रीतम दिसणार पडद्यावर गाताना…

‘मेट्रो इन दिनो’च्या पहिल्या गाण्याचा टीझर आला समोर; १८ वर्षांनी पुन्हा प्रीतम दिसणार पडद्यावर गाताना…

अनुराग बसू यांच्या ‘मेट्रो इन दिनो‘ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटातील ‘जमाना लागे’ या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याच्या टीझरमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टची झलक पाहायला मिळत आहे. आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, फातिमा सना शेख, अनुपम खेर, नीना गुप्ता, कोंकणा सेन शर्मा, अली फजल, पंकज त्रिपाठी यांसारख्या अनुभवी कलाकारांनी सजलेला हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

दोन वर्षांनंतर, आदित्य रॉय कपूर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे आणि या चित्रपटात तो पहिल्यांदाच सैफ अली खानची मुलगी सारासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यापूर्वी हा चित्रपट २०२४ मध्ये प्रदर्शित होणार होता परंतु काही कारणांमुळे चित्रपटाची रिलीज डेट वाढविण्यात आली.

‘मेट्रो इन दिनो’ हा चित्रपट ४ जुलै २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार यांच्या प्रॉडक्शन हाऊस टी-सीरीजच्या बॅनरखाली बनवल्या जाणाऱ्या या चित्रपटाची घोषणा खूप आधी झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बसू करत आहेत आणि काही काळापूर्वी सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरसोबतचे त्यांचे फोटोही समोर आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

छोट्या पडद्यावर सुरुवात तर आता गाजवत आहेत मोठा पडदा; या अभिनेत्रींनी टीव्ही मालिकांतून केले नाव मोठे …

हे देखील वाचा