Wednesday, July 3, 2024

केसामध्ये गजरा अन् पायात घुंगरू घालून उर्वशीने केला कथ्थक डान्स; पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून उर्वशी रौतेलाला ओळखले जाते. तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलिवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. नुकताच काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करत होता. यात व्हिडिओमध्ये ती तिच्या ‘डुब गये’ या गाण्यावर स्लो मोशनमध्ये वाळूवर डान्स करताना दिसत होती. नुकतेच तिने तिच्या डुब गये या गाण्याला मिळालेल्या यशानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

उर्वशी रौतेलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कथ्थक डान्स केला आहे. या गाण्यातील डान्स बरोबरच तिचा लूक देखील सर्वांना खूप आवडला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. तसेच तिने ज्वेलरी घातली आहे. केसामध्ये गजरा माळला आहे. यासोबतच तिने पायात घुंगरू घातले आहे. यामध्ये ती खूपच मनमोहक दिसत आहे. यासोबत तिच्या डान्स स्टेप्स तर अप्रतिम आहेत. ती एका व्हिडिओमध्ये गिरक्या घेताना दिसत आहे. तसेच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये गाण्यावर हवाभाव करताना दिसत आहे. तिचे हे हावभाव बघून कोणीही तिच्या प्रेमात पडेल.

उर्वशीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. हा व्हिडिओ तिने काही तासांपूर्वी शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला एक लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच तिचे चाहते कमेंट करून तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्यचे कौतुक करत आहेत.

या व्हिडिओ सोबत याच पोशाखातील काही फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “डुब गये या गाण्याला प्रेक्षकांचे 11 दिवसाच्या आतच 100 मिलियन पेक्षाही जास्त प्रेम मिळाले आहे.” या गाण्याचे यश साजरे करताना तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/CPiDwCshrQn/?utm_source=ig_web_copy_link

उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले 2’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे 37 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा