Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड उर्फी जावेदला मोठा झटका! इंस्टाग्रामने अकाउंट केलं सस्पेंड; म्हणाली, ‘अनेक लोकांच्या इच्छा..’

उर्फी जावेदला मोठा झटका! इंस्टाग्रामने अकाउंट केलं सस्पेंड; म्हणाली, ‘अनेक लोकांच्या इच्छा..’

प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद नेहमीच तिच्या असामान्य ड्रेसिंग सेन्ससाठी चर्चेत असते. उर्फी कधीही चर्चेत राहण्याची संधी सोडत नाही. ती तिच्या इंस्टाग्रामवर खूप बोल्ड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. परंतु अलीकडेच उर्फीवर कठोर कारवाई करण्यात आली, ज्याची माहिती अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली.

उर्फी जावेद (Uorfi Jawed)तिच्या सोशल मीडियावर सतत फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्फी जावेदचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. तिच्या पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. नुकतेच उर्फी जावेदचे इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले होते. उर्फीने त्याची स्क्रीन शॉर्ट देखील शेअर केली आहे. या फोटोमध्ये इन्स्टाग्रामवरून तिचे अकाउंट सस्पेंड करण्याचा मेसेज आला आहे. आता तुम्ही विचार करत असाल की अकाऊंट सस्पेंड झाल्यावर उर्फीने कसे पोस्ट केले. तर काही वेळानंतर अभिनेत्रीचे खाते रिकव्हर करण्यात आले.

पण त्याचा स्क्रीनशॉट शेअर करून,चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आणि त्याच्या द्वेष करणाऱ्यांवर टीका केली. हा स्क्रीनशॉट शेअर करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले – ‘आज मी पाहिले की अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत.’ उर्फीच्या या पोस्टवर अनेक चाहते तिच्या समर्थनात उतरले असून अनेक जण तिला पुन्हा ट्रोल करत आहेत. तिला ट्रोल करत एका यूजरने लिहिले, ‘मी पाहिलेली 2023ची ही सर्वोत्तम पोस्ट आहे’. दुसर्‍या युजरने लिहिले- ‘ते बंद झाले हे चांगले आहे’. दुसर्‍या यूजरने लिहिले- ‘मी ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आला आणि गेला’.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, उर्फी जावेद अनेक मोठ्या डिझायनर्ससोबत काम करत आहे. अलीकडेच तिने मसाबा गुप्तासोबत काम केले. त्याच वेळी, याआधी ती अबू जानी आणि संदीप खोल्साची शो टॉपर बनली होती. (Urfi Javed account was suspended by Instagram)

आधिक वाचा-
‘अ‍ॅनिमल’वर प्रसिद्ध गीतकारची बोचरी टीका; म्हणाले, ‘भारतीय सिनेमाचा इतिहास लाजिरवाणा झाला आहे…’
‘अ‍ॅनिमल’च्या कमाईचा आलेख बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ, कलेक्शन जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हे देखील वाचा