Friday, July 5, 2024

‘तुम्हाला संजय राठोड आठवतो का?’ चित्रा वाघ यांना उर्फी जावेदचा खोचक प्रश्न

बिग बॉस OTT‘ नंतर प्रसिद्ध झालेली उर्फी जावेद तिच्या विचित्र शैली आणि बोल्ड आउटफिट्ससाठी ओळखली जाते. काही दिवसांपासून उर्फीमध्ये आणि चित्रा वाघ वाद पेटत चालला आहे. सतत एकमेंकींवर टीका करत त्यांचा वाद पेटत जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर नको त्या टीका करत उर्फीवर अश्लीलता पसरवण्याचे आरोप केला आहे. त्याशिवाय त्यांनी उर्फी विरोधात पोलिस तक्रार केली असून काही झालं तरी उर्फीवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. इतकचं नाही तर ती दिसल्यावर तिच्या कानशिलात वाजवणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या वक्तव्यानंतर उर्फी जावेद (Urfi Javed) हिने देखिल चित्रा वाघ यांना नवीन वर्षाचं आव्हान दिलं आहे. चित्रा वाघ यांची संपत्ती उघड केल्यावर चित्रा वाघ जेलमध्ये जाण्यासही तयार असंही उर्फीने सांगितलं आहे. उर्फीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांच्यावर प्रशनांचा भडीमार केला आहे. ती सतत पोस्ट शेअर करत चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला आहे.

आता पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला असून त्यांच्या विषयी सखोल माहिती जमा केल्याचे दिसून येत आहे. तिने लिहिले की,”चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी उत्सुक आहात. भाजप पक्षात जाण्यापूर्वी तुम्हाला संजय राठोड आठवतो का? भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला तुम्ही तर त्यांच्या सर्व चुका विसरुन गेला आहात.”

 

View this post on Instagram

 

उर्फीने चित्रा वाघ यांना संजय राठोड (Sanjay Rathod) यांची आठवण करुन देत असून त्यांच्या नावाने जूनं प्रकरण उखरुन काढलंय असे दिसून येत आहे. पुजा चव्हान (Pooja Chawan)  हिच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड विरोधात लढण्यासठी जिवतोड मेहनत घेत चित्रा वाघ मैदानात उतरल्या होत्या मात्र, त्याशिवाय संजय राठोड यांच्याकडून राजीनामा घ्या अशी टीका सरकारवर करत होत्या. मात्र, तरिही संजय राठोड यांना पूजा चव्हान प्रकरणातून क्लिनचिट मिळाली. मात्र, उर्फीच्या ट्वीटनंतर चित्रा वाघ कोणती भूमिका घेतील हे पाहाणे खूपच महत्वातचे ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कांतारा’च्या या दमदार अभिनेत्याचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड, जाणून घ्या कारण
‘या’ अभिनेत्रींच्या नावावर चाहत्यांनी बांधली मंदिरे, यादी पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

हे देखील वाचा