Monday, November 25, 2024
Home टेलिव्हिजन उर्फी जावेदची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केले दाखल

उर्फी जावेदची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात केले दाखल

आपल्या अनोख्या फॅशन सेन्समुळे दररोज चर्चेत असणारी उर्फी जावेदबद्दल (Urfi Javed) नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्फीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता ही बातमी समोर येताच उर्फीचे चाहते थोडेसे चिंतेत पडले आहेत. काय आहे हे नेमके प्रकरण, चला जाणून घेऊ.

उर्फी जावेद ही हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या अभिनयापेक्षा ती तिच्या अतरंगी फॅशनमुळेच सर्वत्र चर्चेत असते. परंतु सध्या उर्फीच्या प्रकृतीबद्दल एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. बातम्यांनुसार, उर्फी जावेदची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नाहीये. तिला 103-104 ताप कायम राहतो. त्याचबरोबर गेल्या ३ दिवसांपासून उर्फीला भरपूर उलट्या होत आहेत. तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नसल्याने उर्फीला आता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता अभिनेत्रीच्या काही चाचण्या केल्या जाणार असल्याच्या बातम्या आहेत, त्यानंतरच तिचं काय झालं हे कळेल.

अनेक टीव्ही शोमध्ये दिसलेल्या उर्फी जावेदला जेव्हा ती ‘बिग बॉस ओटीटी’चा भाग बनली तेव्हा तिला विशेष ओळख मिळाली. या शोमध्ये ती जास्त काळ टिकू शकली नाही, परंतु तिच्या असामान्य शैलीने तिला जगभरात प्रसिद्ध केले. या शोनंतर उर्फी तिच्या लूकमुळे प्रकाशझोतात आली. अभिनेत्री तिच्या लुकवर प्रयोग करण्यापासून कधीच मागे हटली नाही.

उर्फी ‘बिग बॉस 16’ मधील तिच्या प्रवेशामुळे चर्चेत असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत या वृत्तांचे खंडन केले असून, तिला सलमान खानच्या शोमधून कोणतीही ऑफर मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा –

काय सांगता! ‘जुदाई’ चित्रपटावेळी श्रीदेवी होत्या प्रेग्नेंट, सहअभिनेत्रीनेच केला खुलासा

सुष्मिताच्या हॉटनेसने ललित मोदी क्लिनबोल्ड, व्हायरल व्हिडिओवर दिलेल्या ‘त्या’ कमेंटची रंगली चर्चा

एक चुक नडली! ‘या’ टिव्ही कलाकारांना निर्मात्यांनी चालू मालिकेतून दाखवला होता थेट बाहेरचा रस्ता

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा