सुष्मिताच्या हॉटनेसने ललित मोदी क्लिनबोल्ड, व्हायरल व्हिडिओवर दिलेल्या ‘त्या’ कमेंटची रंगली चर्चा

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या ललित मोदी यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांनी सोशल मीडियावरुन त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. या बातमीने सिने जगतातील कलाकारांसह सुष्मिता सेनच्या चाहत्यांनाही जोरदार धक्का बसला होता. तेव्हापासून सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या प्रेमप्रकरणाचे अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. सध्या सोशल मीडियावर सुष्मिता सेनचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यावरील ललित मोदी यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. 

अभिनेत्री सुष्मिता सेन सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसत असते. नुकताच सुष्मिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती समुद्रात डुबकी मारताना दिसत आहे. सुष्मिताचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, मात्र त्यावर एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही कमेंट बिझनेसमन आणि सुष्मिताचा कथित बॉयफ्रेंड ललित मोदी यांची आहे. त्यांनी कमेंट करून सुष्मिताला हॉट म्हटले आहे. गेल्या महिन्यात ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे जाहीर केले. तेव्हापासून दोघेही सतत चर्चेत असतात.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

या व्हायरल व्हिडिओमध्ये सुष्मिता सेन ब्लॅक टॉप आणि व्हाइट टॉपमध्ये दिसत आहे. ती नौकेवरून उडी मारून समुद्रात डुबकी मारतानाही दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून जिथे चाहते आणि फॉलोअर्स तिचे कौतुक करत आहेत, तिथे तिचा कथित बॉयफ्रेंड ललित मोदी यांनी आपल्या कमेंट्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुष्मिताच्या मनमोहक सौंदर्यावर फिदा झालेल्या ललित मोदी यांनी तिच्या फोटोवर  “सार्डिनियामध्ये हॉट दिसत आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या सुष्मिताचा हा व्हिडिओ आणि ललित मोदी यांच्या कमेंटची तिच्या चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

 

हेही वाचा –

‘नागिण’ मालिकेने ‘या’ अभिनेत्रींना केले मालामाल, मानधनाची रक्कम ऐकून घालाल तोंडात बोटे

एक चुक नडली! ‘या’ टिव्ही कलाकारांना निर्मात्यांनी चालू मालिकेतून दाखवला होता थेट बाहेरचा रस्ता

‘लग्नानंतर पतीवर अवलंबून राहणे चुकीचे की बरोबर?’, चाहत्याच्या प्रश्नावर काय म्हणाली विद्या बालन?

Latest Post