Friday, December 8, 2023

राज कुंद्राने कपड्यावर केलेल्या विनोदावर भडकली उर्फी; म्हणाली, ‘जो दुसऱ्यांचे कपडे काढून पैसे कमावतो तो…’

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती म्हणजेच राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आल्यापासून तो मास्क घालून आणि चेहरा लपवून फिरत आहे अलीकडेच राज कुंदा यांनी स्टँड-अप कॉमेडियन म्हणून पदार्पण केले आहे, ज्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. राज कुंद्राने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर त्याच्या स्टँडअप कॉमेडीचे काही स्निपेट्स शेअर केले आहेत.

एका व्हिडिओमध्ये, तो बिग बॉस ओटीटी 1 मध्ये दिसलेली अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदची खिल्ली उडवताना दिसत आहे. या अभिनेत्रीला राज कुंद्राचा हा विनोद अजिबात आवडला नाही आणि त्याचा राग आला.

राज कुंद्राने गमतीने उर्फी जावेदबद्दल जे सांगितले ते ऐकून ती संतापली आहे. यावर अभिनेत्रीने सोशल मीडियावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आणि शिल्पाच्या पतीवर जोरदार टीका केली.

स्टँड अप कॉमेडीमध्ये स्वतःची खिल्ली उडवताना राज कुंद्राने उर्फी जावेदलाही जाळ्यात घेतले. व्हिडिओमध्ये राज म्हणत आहे – ‘गेल्या 2 वर्षांत मला जर कोणी प्रेम दिले असेल तर ते पापाराझी आहे, कारण पॅम्प्ससाठी फक्त दोन स्टार आहेत. एक मी आणि दुसरी उर्फी जावेद… राज कुंद्रा आता काय घालणार आणि उर्फी जावेद आता काय घालणार नाही हे मीडिया फक्त पाहतो.

राज कुंद्राने गंमतीत गोष्टी सांगितल्या, त्यावर तिथे बसलेल्या प्रेक्षकांनीही खूप टाळ्या वाजवल्या, पण उर्फी जावेद भडकली. तिच्या इन्स्टा स्टोरीवर राजचा व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले आहे – ‘जो इतरांचे कपडे काढून पैसे कमावतो तो आता माझ्या कपड्यांवर कमेंट करेल’.

मात्र, या स्टँड अप कॉमेडीमध्ये राज कुंद्रानेही आपली खिल्ली उडवली आहे. राज कुंद्राने म्हटले आहे की, त्याला शिल्पाचा नवरा, मास्क मॅन आणि स्वस्त कान्ये वेस्ट म्हणूनही ओळखले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘लोकांना वाटले माझे करिअर संपले,’ तब्बूने सांगितला चित्रपट निवडीबद्दल तिचा दृष्टिकोन
बाप सुपरहिट तर लेक सुपरफ्लॉप, राजवीर देओलचा ‘दोनो’ चित्रपट पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कोसळला

हे देखील वाचा