Saturday, July 6, 2024

बॅकलेस टॉप अन् शॉर्ट्स घालून बारमध्ये पोहचली उर्फी जावेद, चाहत्यांना दिलं ‘या’साठी आमंत्रण

उर्फी जावेद अनेकदा तिच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते, तर ट्रोलर्सला ट्रोल करण्यासाठी एक नवीन विषय देत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने तिच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. उर्फीची ही किलर स्टाईल तिच्या चाहत्यांना चांगलीच पसंत पडली आहे.

चाहत्यांना दिले आमंत्रण
उर्फी जावेदने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये ती हातात ड्रिंक घेऊन उभी दिसत आहे. फोटो शेअर करत उर्फीने लिहिले आहे, “या आणि माझ्यासोबत ड्रिंक करा. मला तुमच्या आवडत्या ड्रिंकबद्दल सांगा. मला हे जाणून घ्यायचे आहे की, माझे आवडते ड्रिंक तुमचे देखील आहे का.” यासह, तिने फोटोमध्ये अनेक लोकांना क्रेडिट दिले आहे. (urfi javed backless top and small skirt is getting hot on internet)

https://www.instagram.com/p/CWNIdIpo2d3/?utm_source=ig_web_copy_link

या फोटोंमध्ये उर्फी जावेदचे केस बांधलेले आहेत. तिने लाल रंगाचा बॅकलेस ब्रालेट घातला आहे. त्याचबरोबर तिने थाई हाय शॉर्ट ड्रेस घातला आहे. उर्फी जावेद ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसली होती. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते जे खूप वेगाने व्हायरल होतात.

अलीकडेच उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक डान्स व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती रवीना टंडनसारखी आपली स्टाइल दाखवण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘टिप टिप बरसा पानी…’ गाण्याची धून वाजत होती आणि त्यावर उर्फी नाचत होती. पिवळ्या साडीमधील अभिनेत्रीच्या कातिलाना अंदाजाने चाहत्यांना वेड लावून सोडले.

उर्फी जावेद तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. तिला तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळे अनेकदा ट्रोल केले जाते. तरी उर्फी जावेदवर याचा कोणताही परिणाम होत नाही आणि ती सतत फोटो आणि व्हिडिओमध्ये तिचे फिगर दाखवताना दिसते. अनेकदा ती तिच्या फोटोशूटची झलकही शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा