Saturday, July 6, 2024

आधी फक्त टी-शर्टमध्ये असलेल्या उर्फीने एकाच झटक्यात बदलला लूक; व्हिडिओ ठरतोय लक्षवेधी

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या पडद्यावरील कामांपेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच सतत चर्चेत असतात. यामध्ये सर्वाधिक अभिनेत्रींचा समावेश पाहायला मिळतो. आपल्या नवनवीन पोस्टमुळे त्या सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे उर्फी जावेद. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे उर्फी नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता उर्फीच्या एका नव्या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

आपल्या बोल्ड फोटोंमुळे उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच सोशल मीडियाचे तापमान वाढवत असते. इंस्टाग्रामवर मोठा चाहतावर्ग असलेली उर्फी नेहमीच तिच्या फॅन्सी ड्रेसने चाहत्यांना घायाळ करत असते. तिच्या या विचित्र कपड्यांमुळे अनेकदा तिच्यावर जोरदार टीकाही झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा उर्फीने आपल्या बोल्ड लूकने सर्वांना मोहित केले आहे.

सध्या तिचा हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी आपली वेणी फिरवताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओच्या सुरुवातीला एका टी- शर्टमध्ये दिसणारी उर्फी पुढच्याच क्षणी एका छोट्या ब्रालेट आणि स्कर्ट घातलेली दिसत आहे. तिच्या या ड्रेसमुळे ती खूपच बोल्ड वाटत आहे. या व्हिडिओमधील उर्फीच्या लांब वेणीने आणि चेहऱ्यावर पसरलेल्या बटांनी तिचे चाहते मात्र फिदा झाले आहेत. काहीजण तिला “जुन्या चित्रपटांची अभिनेत्री वाटतेस,” अशी प्रतिक्रिया देत आहेत, तर अनेकांनी केस वाढवण्याचा सल्ला दिला आहे. असे असले, तरीही उर्फीच्या या हॉट व्हिडिओमुळे सोशल मीडियाचा पारा मात्र वाढलेला दिसत आहे.

दरम्यान उर्फी जावेद ही पहिल्यांदा ‘बिग बॉस’च्या ओटीटीमध्ये झळकली होती. तेव्हापासून ती सतत चर्चेत आली आहे. चाहत्यांनी तर तिला जावेद अख्तरची नात असल्याचेही म्हटले होते. मध्यंतरी ती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पत्रकार परिषदेतही दिसली होती, ज्यामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, ती नेहमीच आपल्या करामतीने सर्वांचे लक्ष वेधत असते.

हेही वाचा-

हे देखील वाचा