×

उर्फी जावेद रेस्टॉरंटमध्ये डोके धरून दिसली रडताना, सोबत बसलेल्या मुलावर काढत होती राग

अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे आणि तिचा विचित्र लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती तिच्या हटके कपड्यांमुळे संपूर्ण सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असते. उर्फीचे विविध ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर सतत धुमाकूळ घालत असतात. उर्फीचा क्वचितच असा फोटो असेल की, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली नाही. कधी कधी ती तिच्या हटके स्टाईलमुळे ट्रोलही होते. काही काळापूर्वी पॅपराझी व्हायरल भयानीने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी रेस्टॉरंटमध्ये एका मुलासोबत बसलेली दिसत आहे. ती खूप रागावलेली दिसत आहे आणि रडत आहे. त्याचवेळी उर्फीच्या हातात मोबाईल देखील दिसत आहे.

उर्फीच्या (Urfi Javed) रडणाऱ्या व्हिडिओमध्ये ती  मोबाईलची स्क्रीन दाखवत शेजारी बसलेल्या मुलाशी रागाने बोलत आहे. बोलत असताना ती खूप जोरात रडत आहे. ती डोळे पुसतानाही दिसत आहे. ती  कपाळाला हात लावून रडतानाही दिसत आहे. यादरम्यान उर्फीने फुल स्लीव्ह शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी खूप रागावलेली दिसत आहे. मात्र, ती का रडत आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडिओ शेअर करताना व्हायरल भयानीने कॅप्शनमध्ये रडणाऱ्या इमोजीसह “उर्फी जावेद” असे लिहिले आहे. उर्फीच्या या व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. उर्फीच्या रडणाऱ्या व्हिडिओवर एका युजरने कमेंट केली की, “तिला काय झाले? ती का रडत आहे?” एकाने लिहिले, “उर्फीला काय झाले?” अनेक युजर्सने रडणाऱ्या इमोजी टाकत कमेंट केली.

उर्फी जावेद ट्रोल

काही युजर्सने उर्फीचा अभिनय असे वर्णन केले. एका युजरने लिहिले की, “इसका ५० आना काटो ओवर ॲक्टिंग का.” दुसर्‍या युजरने लिहिले, “ती रडण्याचे नाटक करत आहे, असे का दिसतय?” एका युजरने लिहिले की, “शूटिंग चालू आहे.” आणखी एकाने लिहिले की, “हिला काय झाले..”

उर्फीला ‘बिग बॉस ओटीटी’ मधून मिळाली ओळख

उर्फी जावेद टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शोपैकी एक असलेला ‘बिग बॉस ओटीटी’मुळे लोकप्रिय झाली आहे. उर्फी या शोमध्ये काही अप्रतिम दाखवू शकली नसली तरी या शोने तिला ओळख मिळवून दिली आहे. उर्फी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विशेषतः तिच्या बोल्ड लूकमुळे ती चर्चेत राहते. उर्फीचा ड्रेसिंग सेन्स असा आहे की, ती सार्वजनिक ठिकाण असो वा विमानतळ, सर्वत्र चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.

हेही वाचा :

 

Latest Post