हिजाबचा वाद (Hijab Controversy) हा सध्या मोठा मुद्दा बनला आहे. याबाबत प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणावर आपल्या विचित्र ड्रेसमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या उर्फी जावेदने (Urfi Javed) मौन तोडले आहे. भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर आता उर्फी जावेदचे वक्तव्य आले आहे. या निवेदनात उर्फीने अशी गोष्ट सांगितली आहे, जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
‘हिजाब घालण्यात काही मोठी गोष्ट नाही’
हिजाबच्या वादावर मीडियाशी बोलताना उर्फी जावेद म्हणाली, “मला एवढेच सांगायचे आहे की, महिलेला हवे ते परिधान करण्याचा अधिकार आहे. हिजाब घालू नये म्हणून इतकी वर्षे लढा दिला. महिलांना हवे ते कपडे घालता यावेत, यासाठी आजपर्यंत लढा देत आलो आहोत. जर तिने शाळेत हिजाब घातला तर त्यात काय मोठे आहे? संसदेत किंवा कोठेही तुम्हाला हवे ते घालता येत असेल, तर त्यात मोठे काय आहे?” (urfi javed break silence on hijab controversy)
‘शाळेत हिजाब परिधान करण्याच्या विरोधात मी नाही’
उर्फी जावेद पुढे म्हणाली, “मी कशाच्याही विरोधात नाही. हे फक्त एक उदाहरण आहे. मी त्यांच्या विरोधात नाही (प्रज्ञा ठाकूर काय घालते). त्यामुळे मी शाळेत हिजाब घालणाऱ्या मुलींच्या विरोधातही नाही. माझ्याकडे बघा… मी काहीही घालण्याच्या विरोधात असू शकते का?”
काय म्हणाल्या साध्वी प्रज्ञा ठाकूर?
वास्तविक, भोपाळमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या होत्या, “कोणावर कोणतेही बंधन नाही. हिंदू इतके श्रेष्ठ, उच्च विचारांचे आणि इतके सुसंस्कृत आहेत की आपल्याला कुठेही हिजाब घालण्याची गरज नाही. ज्यांना स्वतःच्या घरात त्रास आहे, त्यांच्या घरात अडचणी आहेत, त्यांना त्यांच्या घरात धोका आहे आणि त्यांच्या घरात त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आहे, त्यांनी हिजाब परिधान केला पाहिजे. म्हणून त्यांनी घरी देखील हिजाब घालावा. जिथे हिंदू समाज बाहेर पडतो तिथे त्यांना हिजाब घालण्याची गरज नाही.”
गेल्या अनेक दिवसांपासून ‘हिजाब प्रकरणा’ने चांगलाच जोर धरला आहे. या प्रकरणावर आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.
हेही वाचा-
- ‘संध्या बींदणी’ने मस्तीच्या मूडमध्ये रस्त्यावरच लावले ठुमके; पाहून तुमचेही थिरकतील पाय
- अरे आओ ना फिर! धरम पाजींनी आपल्या अंदाजात ‘बसंती’ बनलेल्या किरण यांना शिकवले आंबे पाडायला; पाहा व्हिडिओ
- नाद…नाद…नादच! ‘कच्चा बदाम’ गाण्यामुळे भुबन झाला लखपती; दिल्ली- मुंबई सोडाच, थेट बांगलादेशातून येतायत ऑफर्स
हेही पाहा-