Sunday, January 12, 2025
Home टेलिव्हिजन उर्फी जावेदची झाली मोठी फसवणूक; विरोध केला तर दिग्दर्शक म्हणाला, ‘जे करायचंय ते कर…’

उर्फी जावेदची झाली मोठी फसवणूक; विरोध केला तर दिग्दर्शक म्हणाला, ‘जे करायचंय ते कर…’

‘बिग बॉस ओटीटी’ फ्लॅटफॉर्मवर येऊन प्रसिद्ध झालेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोज अशा बोल्ड आणि हॉट फोटोमधील पोस्ट झळकत असतात त्यामुळेच ही अभिनेत्री नेहमीच चर्चेत असते. मात्र आता उर्फी जावेद आपल्या कपड्यांमुळे नव्हे, तर तिची फसवणूक झाल्यामुळे चर्चेत आली आहे. काय आहे तिचा हा नवीन किस्सा चला जाणून घेऊ.

अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या कपड्यांची आणि बोल्ड फोटोंची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळते. मात्र आता उर्फीने एका दिग्दर्शकावर आपली फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. सोबतच तिने यासंबंधीचे स्क्रिनशॉट आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर ठेवले आहेत. ओबेद आफ्रिदी असे या दिग्दर्शकाचे नाव आहे. याबद्दलची सगळी माहिती उर्फीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीला ठेवलेल्या फोटो मधून दिली आहे. उर्फीने या दिग्दर्शकावर काम करूनही पैसे बुडवल्याचा आरोप केला आहे.

या मेसेजमध्ये उर्फीने आफ्रिदीला त्याचे सत्य जगासमोर आणण्याची धमकी दिली आहे. मात्र त्याने “मला काहीही फरक पडत नाही” असं म्हणत तिची खिल्ली उडवत नंतर तिला ब्लॉक केल्याचे दिसत आहे. उर्फीने याचा खुलासा करताना आणखीही मुलींची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचे फोटो आपल्या अकाऊंटवर शेअर केले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर उर्फीने संताप व्यक्त करत “पंजाबी चित्रपट क्षेत्रात अशा नालायक माणसांना कशाला ठेवले आहे?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच या व्यक्तीला आत्ता तुरुंगात असायला हवे होते, असे म्हणले आहे.

या आफ्रिदी नावाच्या व्यक्तीनेही उर्फीला सडेतोड उत्तर देत तिचे स्क्रीनशॉट आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यासोबत “लोकांकडे जळण्याशिवाय काही काम नाही, थोड्या मोठ्या व्हा, काम मागा आणि मग नकार दिल्यावर असे आरोप करा.” असे म्हणत उर्फीवर टीका केली आहे. दरम्यान उर्फीने या व्यक्तीची आधीची माहिती काढत याआधीही अशा ३० मुलींची फसवणूक केल्याप्रकरणी अटक झाल्याची बातमी समोर आणली आहे. त्या मुलींसोबत चर्चा केलेले स्क्रिनशॉटसुद्धा उर्फीने ठेवले आहेत.

हेही वाचा –

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा