×

Wedding | रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा करणार लग्न? अफेअर्सच्या चर्चांनी धरला जोर

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Devarkonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्यामध्ये वाढत चाललेल्या मैत्रीची सध्या चित्रपट क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दोघेही अनेक चित्रपटात एकत्र झळकले असून, अनेकदा ते सोबत फिरताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामुळेच दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे, तर ते लग्न करणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आपल्या दमदार अभिनयासाठी आणि घायाळ करणार्‍या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील अभिनयाने तर सगळ्यांनाच मोहित केले होते. तेव्हापासुन रश्मिका सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता समोर आलेल्या बातमीनुसार, रश्मिका आणि अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत असल्याचेही समजले आहे.

आधीपासूनच दाक्षिणात्य चित्रपटात रश्मिका आणि विजयची जोडी प्रसिद्ध आहे. दोघांनी अनेक गाजलेल्या चित्रपटात एकत्र काम केले असून, त्यांच्या केमिस्ट्रीची सगळीकडे नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. आता दोघेही रिलेशनशीपमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नव्हे, तर दोघेही या वर्षी लग्न करणार आहेत, असे म्हटले जात आहे. मात्र रश्मिका आणि विजयने याबद्दल आत्तापर्यंत अधिकृत माहिती देणे टाळले आहे. विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने ‘डियर कॉम्रेड’, ‘गीता गोविंदम’ अशा प्रसिद्ध चित्रपट एकत्र काम केले आहे.

नुकतेच रश्मिकाने मुंबईत एक घर विकत घेतले आहे. दोघांना अनेकदा मुंबईत फिरताना पाहिले आहे. दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा त्यांच्या गोवा ट्रीपपासून सुरू झाली होती.

तत्पूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदानाने २०१७मध्ये रक्षित शेट्टी सोबत साखरपुडा केला होता. मात्र त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने हे लग्न मोडले. यावेळी रश्मिकाला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागला होता.

हेही वाचा –

Latest Post