Monday, July 15, 2024

उर्फी जावेदच्या बोल्ड लुकने घडवली अद्दल, दिल्लीमध्ये नोंदवली तक्रार

सोशल मीडियाची फॅशनिस्टा म्हणून ओळखली जणारी उर्फी जावेद नेहमी आपल्या अतरंगी स्टाइलने लोकांना हैराण करुन सोडले आहे. ज्या गोष्टी आपण कामासाठी उपयोग करतो त्याचा देखिल उर्फीने ड्रेस बनवून परिधान केला होता. कदाचितच अशी कोणती वस्तु राहिली असेल ज्याचा उपयोग या अभिनेत्रीने काले नसेल. सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी उर्फी आज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिचे नुकतंच ‘आय ये मजबूरी‘ या गाण्याचा व्हिडिओ प्रदर्शित केला आहे. मात्र, या व्हिडिओमुळे तिला चांगलीच अद्दल घडवणार असल्याचे दिसत आहे.

‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) हिचे नवीन गाणे ‘आय ये मजबूरी’ नुकतंच प्रदर्शित झालं असून वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकले आहे. उर्फीने आपल्या अतरंगी स्टाइलने सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. आज तिला कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फीदेखिल कोणत्याही सेलिब्रिटापेक्षा कमी नाही. पहायला गेलं तर बॉलिवूडचे स्टारदेखिल उर्फीचे फॅन आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

माध्यमातील वृत्तानुसार उर्फी जावेदने प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये बोल्ड कपडे परिधान केल्यामुळे दिल्लीमध्ये तिच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. अभिनेत्रीचे ‘आय हाय ये मजबूरी’ हे गाणे 11 ऑक्टोंबरला प्रदर्शित झाले होते. युट्युबवर हे गाणे अपलोड केल्या केल्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आले होते. या व्हिडिओमध्ये उर्फी खूपच बोल्ड लुकमध्ये दिसून येत आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी आणि स्लीवलेस ब्लाउज परिधान केला आहे.या गाण्याने इंटनेटवर कहर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

प्रदर्शित झालेल्या गाण्यावर आतापर्यत 8.5 मिलियन लोकांनी हे गाणे पाहिले असून 27 हजारपेक्षा जास्त लोकांनी लाइक केले आहे. मात्र, तरीही या गाण्यावर काही लोकांनी उर्फीच्या बोल्ड लुकमुळे ( दि.23 ऑक्टोंबर) दिवशी तक्रार नोंदवली आहे, पण तरीही अभिनेत्रीने या विषयावर अजून काहीच प्रतिक्रिया दिली नाही. एवढे मोठे कारण असूनही उर्फीने दिवळी  निमित्ताने पैपराजील मिठाई वाटप करताना दिसली. काही चाहत्यांनी हा व्हिडिओ खूपच व्हायरल केला होता, आणि काहींनी तिच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की, “काहीही असो पण मुलीचे मन खूप निर्मळ आहे.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

उर्फीच्या या व्हिडिओने अनेक चाहत्यांचे मनं जिंकले आहेत. पहायला गेलं तर उर्फी आपल्या चाहत्यांना खुश करण्याची एकही संधी सोडत नाही. ती नेहमी आपल्या चांगुलपणाने चाहत्यांचे मन जिंकत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ मराठी चित्रपटांना तोड नाही! लक्ष्याचे ‘हे’ पाच अफलातून चित्रपट तुम्ही पाहिलेत का?
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी

हे देखील वाचा