Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पिवळ्या साडीमध्ये मादक फिगर फ्लॉन्ट करत पुन्हा एकदा उर्फी जावेदने लावली सोशल मीडियावर आग

प्रसिद्धी मिळवण्यासाठी कलाकार वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असतात, मीडियाचे लक्ष वेधून सोशल मीडियावर सतत चर्चेत राहून लोकप्रियता मिळवणे आजच्या काळात कलाकारांसाठी खूप महत्वाचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटीची स्पर्धक असणारी अभिनेत्री उर्फी जावेद सतत तिच्या बोल्ड लुक्समुळे लाइमलाईट्मधे येत आहे. बिग बॉसच्या घरात धमाल केलेली उर्फी आता बाहेरही सतत मीडियाच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होताना दिसत आहे. उर्फी तिच्या बोल्ड ड्रेसमुळे सोशल मीडियावर ट्रोल देखील होत आहे. मात्र असे असूनही ती कोणाचीही पर्वा न करता ती तिचे फोटो शेअर करत असते.

पुन्हा एकदा उर्फीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले असून, हे फोटो पाहून तुम्हालाही तिचा हा लूक आवडल्याशिवाय राहणार नाही. उर्फीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले असून, यात ती अतिशय सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे. या फोटोमध्ये ती ट्रेडिशनल लूकमध्ये देखील बोल्ड दिसत आहे. उर्फीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून, त्याच रंगाचे डीप नेकचे ब्लाऊज घातले आहे. तिने घातलेले ब्लाऊज अधिक बोल्ड दिसून येत आहे. तिच्या ब्लाऊजवर हेव्ही वर्क केलेले दिसत आहे. यासोबतच तिची पदर घेण्याची स्टाईल देखील लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच तिने गळ्यात एक आकर्षक नेकलेस घातला असून ओले केस पूर्ण मागे घेत मोकळे सोडले आहेत.

उर्फीच्या या फोटोंवर नेटकऱ्यांच्या एकपेक्षा एक भारी कमेंट्स येत असून, तिला ‘क्रिमी डॉल’ म्हटले जात आहे. याशिवाय अनेकांनी हार्ट ईमोजी, फायर ईमोजी पोस्ट केले आहे. तर काहींनी तिचा हा लूक पाहून कॅटरिना कैफची आठवण येत आहे. उर्फी अनेकदा तिच्या अतिबोल्ड लुक्समुळे मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरी गेली आहे. मात्र तरीही ती तिचे फोटो पोस्ट करणे थांबवत नाही.

काही दिवसांपूर्वीच तिने एनिमल प्रिंटची ब्रा आणि स्कर्ट घातला होता. शिवाय ती तिच्या एका मादक व्हिडिओमुळे देखील चर्चेत आहे, ज्यात तिने स्किन रंगाचा टॉप आणि स्कर्ट घातला आहे. यात ती तिची मादक फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा