Monday, July 8, 2024

सुजलेले डोळे अन् विस्कटलेले केस, उर्फीची अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेता चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यामध्ये सोशल मीडियार वॉर होताना आपण पाहातच आहोत. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर टीका करत तिच्या विरोधात तक्रारही नोंदवली आहे. मात्र, तरिही सोशल मीडिया वॉर सुरुच आहे. अशातच उर्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘बिग बॉस ओटीटी’ फेम सोशल मीडिया इनफ्लुएंसर उर्फी जावेद (Urfi Javed) ही सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या आउटफीटवरुन  समाजामध्ये न्यडिटी पसरवते अशी टीका केली आहे. यानंतर उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सतत सोशल मीडियावर वॉर होताना पाहाच आहेत. मात्र, यामध्येच उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिचे विस्कटलेले केस आणि सुजलेले डोळे अशा अवस्थामध्ये दिसून येत आहे. एवढेच काय तर पॅपराझींना पाहिल्यानंतर अभिनेत्री तोंड लपवून पळताना दिसत आहे.

सतत पॅपरीझींना हटके पोज देत असणारी अर्फी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तोंड लपवून पळताना दिसत असल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आपल्या हटके फॅशेन सेन्समुळे चर्चेत असणाऱ्या उर्फीचा नुकतांच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती वेगळ्याच परिस्थितीमध्ये दिसून येत आहे. यावेळी उर्फीने ओव्हरसाइज टी-शर्ट आणि शॉर्ट्स कपडे परिधान केले होते.

 

View this post on Instagram

 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये उर्फी हॉटेलमध्ये पोहोचल्यानतरही पॅपराझींनी तिचा पाठलाग सोडला नाही. त्यानंतर सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो देखिल व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तिच्या डोळ्याखाली काळा वर्तुळ झालेला गोल दिसून येत आहे. उर्फीची ही अवस्था पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय काही नेटकऱ्यांनी उर्फीच्या व्हिडिओवर गंमतीदार कमेंटही केल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गज अभिनेते सतीश शाह यांच्यावर झाली वर्णभेदावरून कमेंट, दिले सणसणीत उत्तर
इंजिनिअरिंग सोडून ‘या’ कलाकारांनी अभिनयात आजमावले नशिब, आज आहेत बॉलिवूडचे स्टार

हे देखील वाचा