आजकाल कलाकारांचे ट्रोल होणे ही काही फार मोठी आणि नवीन गोष्ट राहिलेली नाही. प्रत्येक कलाकाराला त्यांच्या कपड्यांवरुन, त्यांच्या वक्तव्यावरुन किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणाने ट्रोलिंगचा सामना करावाच लागतो. अशात सध्या अभिनेत्री उर्फी जावेद ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे.
अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये झळकली होती. परंतु तिथे ती फार काळ टिकली नाही. त्यानंतर ती खूप चर्चेत राहू लागली. त्याचे कारण तिचा अभिनय नाही, तर तिचे कपडे आहे. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. अशात नेहमी हटके लुक करत फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. पण तिची फॅशन जरा वेगळीच आहे. कारण ती नेमकी कोणती फॅशन करते, हेच लोकांना समजत नाही. त्यामुळे सर्व जण तिला ट्रोल करतात. (urfi javed said on wearing a bikini if i wear it then cheap if i wear starkid then glamor)
अशात तिने आता या सर्व टीका करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लोकांनी तिच्याबरोबर भेदभाव केल्याचा दावा केला आहे. तिने व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, “मी बिकिनी घातली, तर मी चीप दिसते आणि बाकीचे घालतात तेव्हा त्यांना कोणी काहीच बोलत नाही. माझ्याबरोबर सर्वजण भेदभाव करत आहेत. स्टार किड्सने फॅशन केली लोकांना ती आवडते.”
अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते. यामध्ये तिने लाल रंगाचा एक ड्रेस घातला होता. हा ड्रेस खूप सुंदर होता. पण तिने बिकनी घातली की ड्रेस हे समजत नव्हते. यामध्ये ती खूप बोल्ड दिसत होती. यावर आलेल्या वाईट कमेंट नंतर तिने तो व्हिडिओ शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वी तिने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. त्यावेळी तिच्या हटके कपड्यांबद्दल तिला विचारण्यात आले होते की, ती हे पब्लिसिटीसाठी करत आहे का? यावेळी उत्तर देत ती म्हणाली होती की, “जर मी पब्लिसिटी करत असते, तर विमानतळावर कपड्यांविना चालले असते. लोकांना माझ्यापासून नाही माझ्या कपड्यांपासून त्रास होतो. मी काहीही घातले तरी लोक माझ्यावर टीका करतातच.”
काही दवसांपूर्वीच ती विमातळवर दिसली होती. त्यावेळी तिने एक जीन्स घातली होती. सर्व काही ठीक होते. पण तिने जीन्सचे बटन उघडे ठेवलेले. त्यावरुन देखील तिला ट्रोल केले गेले होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप
-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक
-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ