Tuesday, July 9, 2024

जीन्ससोबत उर्फीने फक्त ब्रालेट केली परिधान, बोल्ड फोटोत दिसलं असं काही की, नेटकरी म्हणाले…

‘बिग बॉस ओटीटी’वर धमाल करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शो सोडल्यानंतरही उर्फी अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती विमानतळावर दिसली होती आणि पॅपराजी तिचे फोटो काढण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. उर्फी देखील त्यांना पोझ देणे थांबवत नाही. उर्फीचे अनेक बोल्ड फोटो इंटरनेटचा पारा उंचावत असतात, पण चाहत्यांना या फोटोंमध्ये असे काही दिसले की, त्यांना अभिनेत्रीची काळजी वाटू लागली आहे.

उर्फीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये उर्फीचे सौंदर्य पाहून चाहत्यांचे भान हरवले आहे. फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने निळ्या रंगाची ब्रालेट घातली आहे, ज्यावर तिने जीन्स घातली आहे. त्याचवेळी, तिने तिच्या कपाळावर एक मॅचिंग मांगटिका लावली आहे. फोटोंमध्ये पोझ देण्याची तिची स्टाईल चाहत्यांना वेड लावत आहे. त्याचबरोबर उर्फीच्या फोटोंमध्ये चाहत्यांना तिच्या हातावर दुखापतीच्या खुणा दिसल्या आहेत. हे पाहिल्यानंतर चाहते खूप चिंतित झाले आहेत. ते वारंवार प्रतिक्रिया करून उर्फीला तिच्या दुखापतीचे कारण विचारत आहेत. एका चाहत्याने विचारले की, “उर्फीजी तुमच्या हाताला हे कसं झालं?”

अलीकडेच उर्फी विमानतळावर स्पॉट झाली होती. यादरम्यानचा तिचा व्हिडिओ प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये ती विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान, उर्फी पुन्हा एकदा तिच्या ड्रेसिंगमुळे चर्चेत आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उर्फीने ओपन जॅकेटसह पारदर्शक ब्रालेट घातले आहे. त्याचबरोबर तिने आपले केस मोकळे सोडले आहेत.

उर्फीला या ड्रेसमध्ये पाहून चाहत्यांनी तिला पुन्हा एकदा ट्रोल केले होते. सर्व युजर्सला उर्फीचा हा लूक आवडला नव्हता. काही उर्फीचे कौतुक करत होते, तर काही तिला ट्रोल करत होते. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली की, “ही फक्त विमानतळावरच काम करते.” त्याचवेळी दुसऱ्याने लिहिले की, “हिला कोण ओळखत नाही, प्रसिद्धीसाठी ही पुन्हा पुन्हा विमानतळावर येते.” त्याचवेळी, आणखी एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, “मला हे आवडले.”

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती बिग बॉस ओटीटीचा भाग बनली होती. मात्र, ती आठव्या दिवशी बेदखल झाली होती. याशिवाय, ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’ आणि ‘डायन’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

-भावाच्या अटकेनंतर सुहाना खान पडली आजारी, शाहरुख- गौरीकडून सतत घेतेय अपडेट

-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

हे देखील वाचा