बॉलिवूडमधील प्रसिद्ध धाकड गर्ल म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत सतत प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. सतत सोशल मीडियावर वादग्रस्त विधान शेअर करत कंगना प्रसिद्धी झोतात येत असते. याच वादग्रस्त विधानामुळे कंगनाचे ट्वीटर अकाउंटही सस्पेंड करण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा अभिनेत्री ट्वीटरवर परतली असून तिने शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाबद्दल एक ट्वीट शेअर केलं आहे, ज्यामुळे सोशल मीडिया इनफ्लुएंसर आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिने कंगनाला प्रतिउत्तर दिलं आहे.
सध्या भारतात पठाण (Patahan) चित्रपटाने अनेकांचे लक्ष वेधलं आहे. चित्रपटाचा वाद आणि वाढती लोकप्रियता पाहून अनेकांना आनंद होत आहे तर काहींनी त्याचा विरोध केला आहे. नुकतंच चित्रपट निर्माता प्रिया गुप्ता (Priya Gupta) यांनी थिएटरमधील पठाण चित्रपटाचा एक व्हिडिओ शेअर केला असून पठाणच्या यशाबाबात कौतुक करत ट्वीट शेअर केलं की, “पठाणच्या यशासाठी शाहरुख खान (Shahrukh Khan) व दीपिका पदुकोणचं (Deepika Padukone) अभिनंदन. हिंदू-मुस्लीम सगळेच शाहरुखवर प्रेम करतात. बॉयकॉट ट्रेण्डमुळे चित्रपटाला नुकसान नाही तर फायदा झाला आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे, हे ‘पठाण’मुळे सिद्ध झालं आहे.”
Very good analysis… this country has only and only loved all Khans and at times only and only Khans…And obsessed over Muslim actresses, so it’s very unfair to accuse India of hate and fascism … there is no country like Bharat ???????? in the whole world ???????? https://t.co/wGcSPMCpq4
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 28, 2023
प्रिय गुप्ताच्या या ट्वीटवर कंगाना रनौत (Kangna Ranaut) ने रिट्वीट करत लिहिले की, “हे खूपच छान विश्लेषण आहे. या देशाने सर्व खान नावाच्या कलाकारांनाच फक्त आणि फक्त प्रेम दिलंय. प्रसंगी फक्त खान यांनाच प्रेम दिलंय. मुस्लिम अभिनेत्रींना तर डोक्यावर घेतलंय. त्यामुळे भारतावर द्वेष आणि फॅसिजमचा आरोप करणं अन्यायकारक आहे. जगात भारतासारखा दुसरा कुठलाच देश नाही.” असं म्हणत या दोन्ही अभिनेत्रीने जातिवादाच प्रकरण उखरलं आहे. त्यामुळे उर्फी जावेदनेही कंगनाच्या रिप्लायचं उत्तर दिलं आहे.
Oh my gosh ! What is this division , Muslim actors , Hindu actors . Art is not divided by religion . There are only actors https://t.co/Eap3yYAv0p
— Uorfi (@uorfi_) January 30, 2023
कंगनाने शेअर केलेल्या रिट्वीटला रिप्लाय देत उर्फी जावेद (Urfi Javed)ने लिहिले की, “ओ माय गॉड! हिंदू कलाकार, मुस्लीम कलाकार…काय विभागणी केली आहे. कला ही कधीच धर्माने विभागली जात नाही. कलाकार फक्त कलाकारच असतात.” असं म्हणत उर्फीने कंगनाला प्रतिउत्तर दिलं आहे मात्र, कंगना यावर काय प्रतिक्रिय देइल हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे. पठाण चित्रपटाच्या वादावरुन या दोन अभिनेत्रींमध्ये वादाची ठिणगी तर पेटलीच आहे मात्र, हा वाद इथेच थांबेल की अजून वेगळं वळन घेइल हे पाहाणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मनपाच्या गलथान कारभारामुळे ज्येष्ठ रंगकर्मींवर झाडू मारण्याची वेळ, अंशुमनने व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
‘ते कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केले’, म्हणणाऱ्या हेमांगी कवीची शाहरुख खानबद्दलची ‘ती’ पोस्ट व्हायरल