‘मी कपडे घालायच्या आधी विचार करत नाही’, उर्फी जावेदचे ट्रोलर्सला सणसणीत शब्दात उत्तर

अभिनेत्री उर्फी जावेद ही ‘बिग बॉस ओटीटी’ नंतर खूपच चर्चेत आली. या शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली. घरातील तिचा अंदाज आणि स्टाईल देखील सगळ्यांनी बघितली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. ती तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. तिचा फॅशन सेन्स इतर कलाकारांपेक्षा खूपच वेगळा आहे. नुकतेच उर्फी तिच्या या ट्रोलर्ससोबत तिच्या रिलेशनशिपबाबत बोलली आहे. तिचे असे म्हणणे आहे की, तिला कोणाचाही कसलाच फरक पडत नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार, उर्फी जावेद याबाबत म्हणते की, “माझे ट्रोल्ससोबत खूप चांगले परस्पर नाते आहे आणि हे नाते अजूनही चांगले आहे. मी त्यांना असं काही बोलण्यासाठी नवीन गोष्टी तयार करून देत जाईल आणि या बदल्यात ते मला ट्रोल करत राहतील. यामुळे हे नाते अगदी परस्पर आहे.” यामुळे उर्फीला चर्चेत राहण्यासाठी कारण मिळते का? असा प्रश्न विचारल्यावर तिने उत्तर दिले की, “अजिबात नाही, खरं सांगायचं झाल्यास मी अजिबात असा विचार करत नाही. जर मी असे कपडे घातले तर मला लाईमलाईट मिळेल, असे अजिबात नाहीये. मी तेच कपडे घालते जे मला आवडतात. मला माहित नसते की, कोणत्या गोष्टीवर काय तमाशा होईल आणि काय नाही.” (Urfi javed slams troll who troll her for weird dresses)

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

ती पुढे म्हणाली की, “मी बोलायच्या आधी विचार करत नाही. अनेकांसाठी मी वाईट असू शकते. परंतु माझ्यासाठी मी अशीच आहे. असंच मी कोणतेही कपडे घालण्याआधी विचार करत नाही. ट्रोल्सबाबत मी खूप साधारण विचार करते. यासोबत मला त्यांचे खूप वाईट वाटते. विचार करा की, त्यांचे आयुष्य किती खराब चालले असेल की, ते कोणालाही ट्रोल करतात. मला केवळ एकच गोष्ट माहीत आहे की, लोक शाहरुख खान, सलमान खान आणि शाहरुख खानच्या मुलाला ट्रोल करू शकतात, तर मग मी कोण आहे?”

View this post on Instagram

A post shared by Urrfii (@urf7i)

उर्फी पुढे म्हणाली की, “लोक अनेकवेळा शाहरुख खानच्या पोस्टवर कमेंट्समध्ये हार्ट ईमोजी पोस्ट करत असतात. ते त्यांच्याकडे ऑटोग्राफ देखील मागतील, सेल्फी देखील काढतील, या गोष्टीला कधीच कोण ट्रोल करणार नाही. त्यांच्यामध्ये केवळ पडद्याच्या मागे राहून बोलण्याचा दम आहे. समोर येऊन बोला कोणीतरी मग कशी कानशिलात देईल.”

उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे खूप ट्रोल होत असते. अनेकवेळा ती विमानतळावर स्पॉट होत असते. त्यावेळी तिच्या ड्रेसवरून तिला खूप ट्रोल केले जाते. अशातच सगळ्यांना उत्तर देऊन तिने ट्रोलर्सचे तोंड बंद केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘अरे बिचाऱ्या मुलांवर जरा दया दाखवा’, राखी सावंतचा आर्यन अन् अनन्याला पाठिंबा

-असं काय झालं की, स्वरा भास्कर ट्वीट करत म्हणाली, ‘एक हिंदू असल्याची लाज वाटते’, घ्या जाणून

-गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे साराला पडले महागात, सोशल मीडियावर होतेय ट्रोल

Latest Post