Wednesday, July 3, 2024

उर्फीने कॅम्पिंगसाठी मावळात पाय ठेवताच झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, ‘हिला चपलीने हाणा…’

बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘बेपन्ना’, ‘भैया की दुल्हनिया’ आणि ‘मेरी दुर्गा’ या सारख्या अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या आहे. अभिनयापेक्षाही उर्फी तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. उर्फी दररोज तिच्या ड्रेसिंग सेन्सने लोकांना आश्चर्यचकित करते. अशा परिस्थितीत उर्फी पुन्हा एकदा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे, ज्यामुळे चाहेत तिला चांगलेच ट्राेल करत आहेत. काय आहे नेमके प्रकरण? चला, जाणून घेऊया…

माध्यमातील वृत्तांनुसार, उर्फी मावळमध्ये कॅपिंगसाठी आली हाेती. यादरम्यान अभिनेत्रीने पवना लेक जवळ फाेटाेशूट केले, ज्यााच एक व्हिडिओ साेशल मीडियावर तुफान व्हायरल हाेत आहे. व्हिडिओमध्ये उर्फी बिकीनी परिधान करून प्रचंड बाेल्ड दिसत आहे. यासाेबतच उर्फीने सिंपल मेकअपही केला आहे, जाे तिच्या साैंदर्यात आणखीनच भर घातल आहे. मात्र, नेहमीप्रमाणे उर्फीचा हा बाेल्ड लूक काही चाहत्यांना आवडला, तर काही युजर्स तिला माेठ्या प्रमाणात ट्राेल करू लागले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Telly Talk (@tellytalkindia)

व्हिडिओवर कमेंट करत उर्फीच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘एक दिवस माेठी हिराेइन हाेईल’, तर एका युजरने लिहिले की, ‘मला देखील हिच्यासारखी फिगर पाहिजे.’ अशात एका युजरने अभिनेत्रीला ट्राेल करत म्हणटले की, ‘हिला चपलीने मारा रे कुणीतरी…’ अशा प्रकारे नेटकरी अभिनेत्रीच्या व्हिडिओवर कमेंट करत तिची खिल्ली उडवत आहे.

उर्फी जावेदने आपल्या करिअरची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो ‘टेढ़ी मेढ़ी फॅमिली’मधून केली होती. यानंतर ती ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’ आणि इतर अनेक शोमध्ये दिसली. तिला सर्वाधिक लोकप्रियता करण जोहरच्या ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोमधून मिळाली. याशिवाय उर्फी जावेद ‘स्प्लिट्सविला’च्या 11व्या सीझनमध्ये एक मिसचीफ मेकर म्हणून दिसली आहे. (Urfi Javed trolled for camping in Maval; Users commented, ‘Hit her with a footwear…’)

हे देखील वाचा