Tuesday, August 5, 2025
Home कॅलेंडर ‘तू मला जागा आणि वेळ सांग मी सर्व कागदपत्रे घेऊन येते बदल्यात मला तू….’ उर्मिलाची कंगनाकडे मागणी

‘तू मला जागा आणि वेळ सांग मी सर्व कागदपत्रे घेऊन येते बदल्यात मला तू….’ उर्मिलाची कंगनाकडे मागणी

कंगना राणावत म्हटल्यावर वाद, टीका, विवादित विधाने आदी सर्व सोयीने येतातच. कंगना सध्या कोणत्या ना कोणत्या वादांमुळे किंवा आरोपांमुळे चर्चेत असतेच. शिवसेना आणि कंगना यांचा वाद तर सर्वश्रुत आहे. कंगना शिवसेना आणि शिवसेना नेते यांच्यावर बोलायची एकही संधी सोडत नाही.

नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने खार येथे कार्यालय खरेदी केले आहे. या कार्यालयाची किंमत पावणे चार कोटी असल्याचे समजते. यावरुनच कंगनानं पुन्हा एकदा उर्मिलाला डिवचले आहे. याबाबत कंगनाने एक ट्विट केले आहे. ‘भाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळाले नाही. पण उर्मिला यांना काँग्रेसमुळे खूप फायदा झाला आहे. उर्मिलाजी मी स्वतःच्या मेहनतीने घर विकत घेतले होते. पण काँग्रेस माझे घर तोडत आहे, शिवाय, भाजपला खूश करुन माझ्या हातात फक्त २५ ते ३० कोर्ट केस आल्या आहेत. मी ही तुमच्यासारखी समजूतदार असते तर काँग्रेसला खुश केले असते,’ असा टोला तिने उर्मिलाला लगावला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1345610003596541954

कंगनाच्या या आरोपांना सडेतोड उत्तर देत उर्मिलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत कंगनाला टॅग केला आहे.

 

यात उर्मिलाने म्हटले आहे की, ” कंगनाजी माझ्या बाबतीतले तुमचे उच्च विचार मी ऐकले, किंबहुना संपूर्ण देशाने ते ऐकले संपूर्ण देशासमोर मी सांगते की, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा. सर्व कागदपत्रे घेऊन मी येते. या कागदपत्रांमध्ये मी २०११ साली स्वतःच्या मेहनतीने अंधेरीत फ्लॅट विकत घेतल्याचा पुरावा देखील तुम्हाला मिळेल. जो मी माझ्या २० ते ३० वर्षांच्या करियरमध्ये जी संपत्ती मिळवली यातूनच घेतला होता.”

“सोबतच मार्च २०२० मध्ये तोच फ्लॅट विकल्याची कागदपत्रे आणि पुरावे असतील. त्याच पैशातून विकत घेतलेल्या ह्या ऑफिसची कागदपत्रे सुद्धा असतील. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी झालेल्या व्यवहारातून मी हे ऑफिस विकत घेतले आहे, हेही दाखवेल”, असेही म्हटले आहे.

यासोबतच उर्मिलाने कंगनाला देखील एक आवाहन केले आहे की, “या बदल्यात तुम्ही मला त्या लोकांची नावे द्या, जी नावे तुम्ही NCB ला देणार होतात, आणि ज्या नावांसाठीच तुम्हाला तुमच्या सरकारने वाई प्लस सिक्योरिटी दिली होती.”
कंगना आता उर्मिलाच्या या ट्विटला काय उत्तर देते हे बघावे लागेल.

हे देखील वाचा