Wednesday, June 26, 2024

का होतोय उर्मिला मातोंडकरचा नवरा ट्रोल? कारण सांगताना उर्मिलाचा झाला संताप…

बी-टाऊन ची रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. उर्मिलाने सिनेसृष्टीतून माघार घेतली नसली तरी ती तीचा पूर्ण वेळ राजकारणासाठी देताना आपल्याला दिसतेय. लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत तिने काँग्रेस तर्फे उत्तर पश्चिम मुंबईतून निवडणूक लढवली आणि त्यात तिचा दारुण पराभव झाला. अशातच तिने पुढील काही काळात मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर मांडत काँग्रेसला रामराम ठोकला होता. यानंतर उर्मिला आपल्याला राजकीय पटलावर फारशी ऍक्टिव्ह दिसली नाही परंतु ती सोशल मिडियामार्फत राज्य आणि देशपातळीवर घडणाऱ्या गोष्टींवर तिचं मत मात्र व्यक्त करत राहिली. काही दिवसांपूर्वी हीच उर्मिला शिवसेनेत गेली आणि ती पुन्हा राजकारणात सक्रिय झाली.

उर्मिला ही सध्या माध्यमांना मुलाखती देत असते. अशाच एका मुलाखतीत तिने तीच दुःख सांगितलं. इतक्या दिवसांची तिच्या मनातली सल तिने बोलून दाखवली. जसं की आपल्याला ठाऊक आहेच की उर्मिलाचं लग्न २०१६ मध्ये काश्मिरी मॉडेल आणि व्यावसायिक मोहसीन अख्तर मीर याच्याशी झालं. आणि हीच ती बाब आहे की जिच्यामुळे दोघांना ट्रोल केलं जातं. ऊर्मिलाचे पती मोहसीन अख्तर यांना पाकिस्तानी म्हटलं जातं, यामुळे उर्मिलाला खूप सारा वैयक्तिक त्रास आणि मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. उर्मिला म्हणाली की तिचे पती फक्त मुस्लिम नाही आहेत तर काश्मीरी मुस्लिम आहेत. आणि आम्ही दोघेही अपापल्या धर्माच्या चौकटीत राहून त्याचं पालन करतोय. मग या ट्रोलर्स यामध्ये आमच्या दोघांच्या कुटुंबांना मध्ये ओढल जात आहे आणि त्यांना देखील ट्रोल करून मानसिक त्रास दिला जात आहे.

Urmila with her husband Mohsin Akhtar

या सर्व वादांचा सामना करत असतानाच ऊर्मिलाच इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलं. अर्थात उर्मिलाने त्वरित पोलिसांकडे धाव घेतली आणी घडला प्रकार सांगितला. पोलिसांनी देखील उर्मिलाला तीचं इंस्टा अकाउंट पुन्हा पूर्ववत करून दिलं. अशा या सध्या राजकारणी असलेल्या उर्मिला मातोंडकरची रंगीला, जुदाई, आजोबा, मासुम, अशा अनेक सिनेमांमधून आपल्याला उत्तम अभिनयाची झलक पाहायला मिळते.

हे देखील वाचा