Thursday, January 22, 2026
Home मराठी गोड बातमी! उर्मिला निंबाळकरच्या आयुष्यात अखेर तिच्या ‘त्या’ हिरोची एन्ट्री; कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

गोड बातमी! उर्मिला निंबाळकरच्या आयुष्यात अखेर तिच्या ‘त्या’ हिरोची एन्ट्री; कलाकारांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने ती आई झाल्याची गोड बातमी दिली आहे. उर्मिला ज्या दिवसाची महिला नऊ महिन्यांपासून वाट बघत होती, अखेर तो क्षण आला आणि ती आई झाली आहे. ३ ऑगस्ट रोजी उर्मिलाने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिला मुलगा झाल्याची गोड बातमी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर एक सुंदर पोस्ट शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला आहे.

उर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “वडिलांवर, भावावर (वैभव निंबाळकर), दिरावर, सासऱ्यावर आणि सगळ्यांत जास्त चुकलं म्हणजे, नवऱ्यावर Sukirt Gumaste अति प्रेम असलं की, रंगभुमीपेक्षा जास्त नाट्य निर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरोची एन्ट्री होते. माझ्या आयुष्यात ३ ऑगस्टला सकाळी हिरोची एन्ट्री झालीय, अशी हटके आणि आकर्षक पोस्ट उर्मिलाने लिहिली आहे.” यासोबतच तिने या पोस्टमध्ये #blessedwithbabyboy #Babyboy #newmomlife असे तीन हॅशटॅग देखील वापरले आहे.

उर्मिलाच्या या पोस्टवर तिच्या फॅन्ससोबतच स्वप्नील जोशी, जुई गडकरी आदी अनेक कलाकार देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. ३ ऑगस्टला उर्मिलाने तिच्या बाळाला जन्म दिला आणि ३ ऑगस्टलाच तिने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने ‘कोणत्याही क्षणी..आनंद, परमानंद, गोविंद’ अशी पोस्ट लिहिली होती.

काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. अगदी राजेशाही थाटात तिचे डोहाळे जेवण संपन्न झाले. तिने शेअर केलेल्या फोटोंमधून तिचे डोहाळे जेवण किती मोठे आणि सुंदर साजरे झाले असेल याचा अंदाज लावणे निव्वळ अशक्यच.

मराठमोळी अभिनेत्री उर्मिला निंबाळकर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा विषय आहे. उर्मिला एक अभिनेत्री असण्यासोबतच एक यूट्यूबर देखील आहे. तिने तिच्या प्रेग्नन्सीमधील प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण अतिशय सुंदर पद्धतीने जगला. ती तिचा हा सुंदर प्रवास तिच्या ब्लॉगमधून सर्वांसोबत शेअर करत होती. यावरून ती अनेकदा ट्रोल देखील झाली. मात्र तिने तिच्या उत्तरातून ट्रोलर्सची बोलती बंद केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा