Thursday, April 25, 2024

‘एका जीवाचं वजन उचलतोय’ उर्मिला निंबाळकरची डिलिव्हरीनंतरच्या स्त्रीच्या त्रासावरची पोस्ट व्हायरल

मराठमोळी अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर ही सोशल मीडियावरील सर्वात सक्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. उर्मिला मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये काम करताना दिसते. उर्मिला ही तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे जास्त प्रकाशझोतात आणि चर्चेत असते. अतिशय स्पष्ट आणि मार्मिक भाषेत तिच्या सोशल मीडिया पोस्ट असल्यामुळे त्या जास्त गाजताना दिसतात. काही महिन्यांपूर्वीच उर्मिला आई झाली. आई होणाऱ्या या पासून ते आई झाल्यानंतर तिने तिचे सर्वच अनुभव या अशा पोस्टच्या माध्यमातून शेअर केले. नुकतीच उर्मिलाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने बाळंतपणानंतर स्त्रीला कोणत्या दिव्यातून जावे लागते हे सांगितले आहे.

उर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या पुढच्या बाजूला फक्त ६ महिन्यांपूर्वी पडलेले टाके आजही थंडीत ओढले जातात. समाजमान्य नाजुक बांध्याच्या व्याख्येत न बसणारा हा बांधा, नुसता आर्थिक दृष्ट्या सबळ नाही, तर गेले १५ महिने झाले एका जीवाचं वजन उचलतोय…कधी अलगद तर कधी वेदनेत.” या पोस्टसोबतच तिने तिचा पिवळी साडी आणि हिरवे ब्लाऊज घातलेला एक पाठमोरा फोटो देखील शेअर केला आहे. तिच्या या पोस्टवर नेटकाऱ्यानी भरभरून कमेंट्स करत तिचे आणि तिच्या पोस्टचे कौतुक केले आहे.

याआधी देखील उर्मिलाने सिझेरियन डिलिव्हरी विषयावर एक मोठी पोस्ट लिहिली होती. उर्मिलाने ऑगस्टमध्ये एका बाळाला जन्म दिल्यानंतर तिला चाहत्यांनी नॉर्मल डिलिव्हरी झाली की सीझर, असा प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. यावर उत्तर देताना तिने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने लिहिले होते की, “अजून शंभराव्या व्यक्तीनं विचारायच्या आधीच ही पोस्ट! या पोस्टचे कारणही, मी यांचे उत्तर कोणतेही दडपण किंवा कमीपणा न घेतां देऊ शकते म्हणून, परंतु इतर स्रीयांना या इतक्या खाजगी प्रश्नाचा त्रास होऊ शकतो. कारण यांतही तीची तुलना केली जाऊन तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते. माझं ‘C’ section झालं. Delivery नंतर बाळ आणि मी दोघेही अतिशय सुदृढ आणि सुखरुप आहोत पण तरीही सीझर होण्याची माझी कारणे खालील प्रमाणे १. My pelvic bone structure and baby’s head was not in the proportion.
म्हणजेच माझा ओटीपोटाचे/कंबरेचे हाड/साचा आणि बाळाचे डोके हे समान मापाचे नव्हते.
बाळाचे डोके हे मोठे असल्याकारणाने गर्भारपणात कितीही व्यायाम किंवा योग्य आहार घेतलात तरीही अशा वाढ झालेल्या बाळांची normal delivery शक्य नसते.
यांचे कारण अनुवंशिकता. My baby’s head was bigger than my bone structure which is impossible to change even if you exercise or have perfect diet.
२. An umbilical cord that is wrapped around a baby’s body twice so my baby couldn’t fix himself in my pelvis. बाळाच्या भोवती दोनदा नाळ गुंडाळली गेली जी emergency नव्हती पण त्यामुळे त्याला बाहेर येणे किंवा खाली घसरणे केवळ अशक्य होते. Pregnancy diet, Pregnancy मधील व्यायाम हे चोख पार पाडून मीही normal delivery होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि normal साठीच प्रयत्न करायला हवा परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच normal आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. Normal असो वा C section, बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.”

उर्मिलाने ३ ऑगस्ट २०२१ रोजी गोंडस बाळाला जन्म दिला. आपल्याला मुलगा झाल्याची गोड बातमी उर्मिलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

हे देखील वाचा