छोट्या पडद्यावरील खलनायकाच्या व्यक्तिरेखेची व्याख्याच बदलून टाकणाऱ्या उर्वशी ढोलकियाला (Urvashi Dholkia) वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. मात्र प्रसिद्ध टीव्ही शो ‘कसौटी जिंदगी की’मध्ये कोमोलिकाच्या भूमिकेने आपली छाप पाडलेल्या उर्वशीला सध्या काम मिळत नाहीये. नुकतेच उर्वशी ढोलकियाने खुलासा केला आहे की, कोणत्या कारणामुळे तिला अभिनेत्री म्हणून भूमिका मिळण्यात खूप अडचणी येत आहेत.
‘त्यामुळे’ करावा लागतोय अडचणींचा सामना
नुकत्याच एका मीडिया मुलाखतीदरम्यान, उर्वशी ढोलकियाने तिच्या करिअरबाबत सुरू असलेल्या संघर्षावर मौन सोडले आहे. उर्वशी ढोलकियाने सांगितले की, एक टाइपकास्ट भूमिका केल्यामुळे तिला काम मिळण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. ती म्हणाली, “मी बहुतेक टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका केल्या आहेत. अशा परिस्थितीत कोणी मला इतर सकारात्मक भूमिकांसाठी संधी देत नाही. माझी प्रतिमा नकारात्मक व्यक्तिरेखा असलेल्या अभिनेत्रीची बनली आहे. मात्र, असे असूनही मला चाहत्यांकडून भरभरून दादही मिळते आणि चाहत्यांनाच मला खलनायकाच्या भूमिकेत पाहायला आवडते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.” उर्वशी ढोलकियाने अलीकडेच एकता कपूरच्या (EKta Kapoor) ‘नागिन ६’ शोमध्ये खलनायकाची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. (urvashi dholakia shocking reveals about not getting work in tv industry)
उर्वशी ढोलकियाची कारकिर्द
उर्वशी ढोलकिया ही टीव्ही जगतातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक आहे. इतकेच नाही, तर तिने गेल्या ३८ वर्षांपासून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या प्रदीर्घ कारकिर्दीत उर्वशी ढोलकियाने ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘नच बलिए’, ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘जमाना बदल गया’ आणि ‘देख भाई देख’ यांसारख्या मोठ्या शोमध्ये काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा