Monday, September 25, 2023

वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी थाटला तिने संसार; तर 17व्या वर्षी उर्वशी ढोलकिया बनली होती दोन जुळ्या मुलांची आई

टेलिव्हिजनवरील ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेत्री उर्वशी ढोलकीया. या मालिकेतील अभिनयाने तिने सर्वांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले होते. टेलिव्हिजन दुनियेत तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. उर्वशी ही ‘बिग बॉस 6’ ची विजेती स्पर्धक देखील आहे. आज उर्वशीचा वाढदिवस आहे. उर्वशीचा जन्म 9 जुलै 1979 मध्ये झाला होता. ( Birthday special : television fame urvashi dholkiya got married in age of 16)

उर्वशीने 1987 साली टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘श्रीकांत’मधून तिच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. यानंतर तिने ‘देख भाई देख’, ‘शक्तिमान’, ‘मेहेंदी तेरे नाम की’, ‘चंद्रकांता’ यांसारख्या मालिकेत काम केले.

उर्वशीचा फिटनेस आणि सौंदर्य पाहून कोणीही तिच्या वयाचा अंदाज लावू शकत नाही. तिच्याकडे पाहून कोणीही म्हणणार नाही की, ती 40  वर्षांची आहे. उर्वशीने खूप कमी वयात लग्न केले होते. तिने जेव्हा लग्न केले, तेव्हा ती केवळ 16 वर्षांची होती. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.

उर्वशी आता सागर ढोलकिया आणि क्षितिज ढोलकिया या दोन 25 वर्षांच्या मुलांची आई आहे. ती नेहमीच तिच्या मुलांचे एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी पालन पोषण करत असते. ती नेहमीच तिच्या मुलासोबत मस्ती करताना दिसत असते. ती तिच्या मुलांसाठी एवढं झोकून काम करते की, तिचे तिच्या पतीसोबत नाते तुटले आहे हे दुःख देखील ती विसरली आहे.

एका मुलाखतीत उर्वशीने सांगितले होते की, तिच्या मुलांचे असे म्हणणे आहे की, तिने पुन्हा एकदा लग्न केले पाहिजे.

उर्वशीने वयाच्या 11 व्या वर्षी नादिरा बब्बर थिएटर जॉईन केले होते. ‘सच का सामना’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘नच बलिये’ यांसारख्या शोमध्ये तिने काम केले आहे.

अधिक वाचा- 
स्वत:च्याच लग्नात ऋषी कपूर-नीतू सिंग यांना आलेली चक्कर
बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत सर्वात महागड्या घरांच्या मालकीण, किंमत ऐकून तुम्ही व्हाल अवाक्

हे देखील वाचा