छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस 6 ची विजेता उर्वशी ढोलकिया हिच्याशी जोडलेली एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ‘कसौटी जिंदगी की‘ फेम कोमोलिका नावाने घराघरात पोहोचलेली उर्वशीच्या कारला एका बसने धडक मारली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला आहे. ही घटना (दि, 8 फेब्रुवरी) रोजी घडली आहे.
टीव्ही क्षेत्रामधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिने अनेक मालिकांमध्ये खलनायकी भूमिका निभावल्या ज्या प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरल्या. आजही अभिनेत्रीला ‘कोमोलिका’ नावनेच जास्त ओळखलं जातं. सध्या अभिनेत्री टिव्ही क्षेत्रापासून थोडी लांब आहे मात्र, ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अशताच अभिनेत्रीसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार अभिनेत्री उर्वाशी आपल्या कारने एका स्टुडिओकडे जात होती तिथेच उर्वशीची शुटिंगही सुरु होती. मात्र, रस्त्यामध्येच एका शाळेच्या बसने अभिनेत्रीच्या कारला टक्कर मारली. वृत्तातून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीने अजूनही कोणत्याच प्रकारची तक्रार नोंदवली नाही. कारण, तिच्या मते हे सगळं एक दुर्घटना होती. तिच्या चाहत्यांना काळजी करण्याची गरज नाही अभिनेत्री एकदम ठीक आहे तिला कोणत्याच प्रकारची दु:खापत झाली नाही. त्याशिवाय डॉक्टरांनी तिला तीन दिवसासाठी बेट रेस्ट सांगितला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या कारमध्ये उर्वशी होती त्यासोबत तिचा स्टाफही होता, आनंदाची बातमी म्हणजे या कारमध्ये असणाऱ्या कोणत्याच व्यत्तीला दुखापत झाली नाही.
उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्द बोलायचे झाले तर अभिनेत्रीने 16 वर्षाची असतानाच लग्न केलं होतं आणि 17 व्या वयातच ती जुळ्या मुलांची आई झाली होती.लग्नाच्या 2 वर्षानंतर उर्वशीचा घटस्फोट झाला होता. यानंतर अभिनेत्री एकदम तुटली होती त्यामुळे तिने ना लग्न केलं ना कधी कोणाच्या प्रेमात पडली. सध्या अभिनेत्री आपल्या दोन मुलांसोबत आनंदाचं आयुष्य जगत आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी उर्वशीने ‘नागिन 6’ मालिकामध्ये काम केलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अमिताभ बच्चन यांच्या मुलाला पाहण्यासाठी जेव्हा गावकऱ्यांनी केली होती गर्दी, अभिषेक बच्चनने केला ‘तो’ प्रसंग शेअर
…म्हणून अजय देवगणमुळे अभिषेक बच्चनला रस्त्यावरच काढावी लागली होती रात्र, वाचा संपूर्ण किस्सा