Saturday, July 6, 2024

बाबो! उर्वशी रौतेलाचा ड्रेस इतका महागडा की, त्या किंमतीत येऊ शकतं एखादं घर, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या फॅशन स्टेटमेंटमुळे नेहमीच चर्चेत असते. कॅज्युअल असो, डिझायनर किंवा एअरपोर्ट लूक असो, उर्वशी प्रत्येक स्टाईलमध्ये अतिशय ग्रेसफुल दिसते. ती चित्रपटांपेक्षा अधिक सोशल मीडियावर सक्रिय असते. अलीकडेच पुन्हा एकदा उर्वशीने शो स्टॉपर लूकसह फॅशनच्या दुनियेत जलवा केला आहे.

अलिकडेच सुप्रसिद्ध डिझायनर मायकल सिन्कोसोबत रॅम्पवॉक करताना ती अतिशय सुंदर दिसत होती. यावेळी ती एखाद्या सिंड्रेलापेक्षाही कमी दिसत नव्हती. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियावर डिझायनरसोबत रॅम्पवॉकची एक झलक दाखवली आहे. तसेच समोर आलेल्या या लूकमध्ये उर्वशी अगदी परीसारखी दिसत आहे. (urvashi rautela ball gown worth more than you ctc this cost will make you jump from your chair)

यावेळी उर्वशीने हेवी गाऊन घातला होता. अभिनेत्रीने रॅम्पवॉकचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर अपलोड करताच, तो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे . उर्वशीच्या या ड्रेसची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. उर्वशीच्या या गाऊनची किंमत ४० लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर उर्वशी रौतेला एका मोठ्या बजेटच्या ‘सायंस-फिक्शन’ तमिळ चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण करणार आहे, ज्यात ती माइक्रोबायोलॉजिस्ट आणि आयआयटीयनची भूमिका साकारणार आहे, आणि यानंतर ती दुहेरी भाषेत थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे.

उर्वशी रौतेला ‘ब्लॅक रोझ’ तसेच ‘थिरुतु पायले २’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. अभिनेत्रीला अलीकडेच गुरु रंधावासह ‘डूब गये’ आणि मोहम्मद रमजानसह ‘वर्साचे बेबी’ गाण्यांसाठी ब्लॉकबस्टर रिस्पॉन्स मिळाला होता. जिओ स्टुडिओच्या वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’मध्ये उर्वशी रौतेला रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाहरुखच नाही, तर त्याच्यासारखा दिसणारा व्यक्तीही संकटात; आर्यनच्या अं’मली पदार्थ प्रकरणानंतर मिळत नाहीये काम

-ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा किंग खानला पाठिंबा; म्हणाले, ‘…इंडस्ट्रीमध्ये सर्व भित्र्या व्यक्ती’

-सैफ अली खानने तैमूरबद्दल केला खुलासा म्हणाला, ‘जेहच्या जन्मानंतर तैमूर अधिक…’

हे देखील वाचा