Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

लीक झालेल्या त्या बाथरूम व्हिडीओबाबत उर्वशीने सोडले मौन; म्हणाली, ‘कोणत्याही स्त्रीला असा अनुभव येऊ नये’

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सध्या अक्षय ओबेरॉयसोबत तिचा पुढचा चित्रपट ‘घुसपैठीये’ च्या रिलीजच्या तयारीत आहे. पण रिलीज होण्याआधी, तिचा लीक झालेला बाथरूम व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्री वादात सापडली. आता उर्वशीने लीक झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हे फुटेज तिच्या आगामी ‘घुसपैठीये’ चित्रपटातील दृश्य असल्याचे अभिनेत्रीने स्पष्ट केले आणि ते व्हायरल झाल्याबद्दल तिने निराशा देखील व्यक्त केली.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उर्वशी रौतेला म्हणाली की, ‘जेव्हा व्हिडिओ समोर आला, तेव्हा मी स्वाभाविकपणे नाराज झाले होते. हा खाजगी क्षण नसून घुसखोरीचा भाग आहे, आणि तो अतिशय निराशाजनक आहे. तिला कधी खाजगी क्लिप लीक झाल्याचा सामना करावा लागला आहे का असे विचारले असता तिने ठामपणे उत्तर दिले कि, नाही ! आणि मला आशा आहे की कोणत्याही स्त्रीला कधीही असा अनुभव येऊ नये.
हा खाजगी व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरला आणि नेटिझन्समध्ये चर्चेला उधाण आले की, हे गोपनीयतेवर आक्रमण आहे की प्रसिद्धी स्टंट आहे. त्यातल्या त्यात उर्वशी आणि तिच्या मॅनेजरमधील फोन कॉल रेकॉर्डिंग देखील लीक झाले, ज्यामध्ये तिने परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून क्लिप काढून टाकण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.

सुसी गणेशन दिग्दर्शित ‘घुसपैठीये’ हा चित्रपट ९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे, अशा परिस्थितीत उर्वशी इतर कारणांमुळेही चर्चेत आहे. नंदामुरी बालकृष्णाच्या तेलुगू चित्रपट ‘NBK 109’ च्या सेटवर नुकतीच तिला दुखापत झाली होती, त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्वशीच्या टीमने पुष्टी केली की तिला गंभीर फ्रॅक्चर झाला आहे, परंतु चाहत्यांना खात्री दिली की तिला उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळत आहे आणि ती बरी होण्याच्या मार्गावर देखील आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सलमानची पहिली प्रेमकथा; १९ व्या वर्षी झालं पाहिलं प्रेम !
न्यू जर्सीमध्ये फॅनने लावला होता बिग बींचा पुतळा, गुगल मॅपमध्ये सापडली ही खास जागा

हे देखील वाचा