Saturday, July 6, 2024

उर्वशी रौतेला रस्त्यावर देत होती हटके पोझ, मात्र कॅमेऱ्यात अचानक कैद झाली ‘मोठ्ठी’ चूक

‘सिंग साब द ग्रेट’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अशात आपल्या सुंदर आणि हॉट फोटोंनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करते. पहिल्याच चित्रपटापासून अभिनेत्री तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. अशात तिचा आणखी एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा फोटो पाहून तुम्हीही हसू लागाल.

अभिनेत्री शुक्रवारी जुहू येथे सार्वजनिक ठिकाणी दिसली. त्यावेळी नेहमी प्रमाणे चाहत्यांचा घोळका जमला. अनेकांनी तिचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी उर्वशीने लाल, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेला एक सॅटीन शर्ट घातला होता आणि एक डेनीम पँट घातली होती. यावेळी तिची हेअर स्टाईल देखील साधीच होती. अभिनेत्री यामध्ये खूप सुंदर दिसत होती. पण ती तिच्या शर्टावर असलेला किंमतीचा टॅग काढायला विसरली. (Urvashi Rautela came on road in a stylish shirt got a big mistake with her dress)

हा किंमतीचा टॅग एकाने कॅमेऱ्यात कैद केला. यावर सर्व नेटकऱ्यांची नजर पडली. मग काय सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली. कायमच महागड्या कपड्यांमध्ये हॉट आणि बोल्ड फोटोशूट करणारी उर्वशी किंमतीचा बिल्ला काढायला कशी काय विसरली? असे प्रश्न सर्वजण विचारू लागले.

उर्वाशीच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यामध्ये ती एक सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि आईआईटीयनची भूमिका साकारणार आहे. तसेच  ‘थिरुतु पायले २’च्या हिंदी रिमेकमध्ये देखील ती झळकणार आहे. ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटामध्ये ती एक मुख्य भूमिका साकारणार असून सध्या अभिनेत्री ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.

साल २०१४ मध्ये आलेले गाणे ‘लव डोस’ मधून उर्वशीला विशेष पसंती मिळाली. त्यानंतर ती ‘एक लडकी भीगी भागी सी’, ‘बिजली की तार’ अशा अनेक गाण्यांमध्ये दिसली. ‘समन रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘काबिल’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने दमदार अभिनय केलेला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उर्वशी रौतेलाच्या हवेत उडणाऱ्या केसांनी चाहत्यांना केले घायाळ; अदा पाहून नेटकरी म्हणाले, ‘उफ्फ!’

-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

-उर्वशी रौतेलाच्या शिरपेचात मानाचा तुरा, दोन आंतराराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

हे देखील वाचा