Tuesday, January 20, 2026
Home कॅलेंडर फक्त पंधरा मिनीट! न्यू इयर पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्रीने मोजले ‘इतके’ कोटी रुपये

फक्त पंधरा मिनीट! न्यू इयर पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी अभिनेत्रीने मोजले ‘इतके’ कोटी रुपये

बॉलिवूड कलाकारांची लोकप्रियता जगभरात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे दरवर्षी बॉलिवूड कलाकारांना नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये आमंत्रित केलं जातं. तिथे नववर्षाच्या स्वागतासाठी निरनिराळे कार्यक्रम असतात आणि यासाठी आपले कलाकार हे रग्गड फी देखील आकारतात. याच वर्षी अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला दुबईमध्ये नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं गेलं. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उर्वशीने किती फी आकारली आहे माहितीये. आकडा ऐकाल तर अवाक व्हाल!

न्यू इयर पार्टीमध्ये फक्त १५ मिनिटांच्या उपस्थितीसाठी उर्वशी रौतेलाने ४ कोटी रुपयांची रक्कम घेतली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री दुबईच्या पंचतारांकित हॉटेल प्लाझा वर्सास येथे ही पार्टी झाली. या पार्टीत अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांशीही संवाद साधला. उर्वशीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन या कार्यक्रमाचं हे पोस्टर शेअर केलं आहे.

https://www.instagram.com/p/CJdelfmhto_/

उर्वशीचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प
उर्वशी लवकरच इजिप्शियन अभिनेता मोहम्मद रमजानसोबत एका प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी उर्वशीने रमजानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्याच्या कॅप्शन मध्ये तिने असे लिहिले आहे की, “मी पुढच्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्टमध्ये इजिप्तचा सुप्रसिद्ध अभिनेता मोहम्मद रमजानसोबत शूट करत आहे. यापूर्वी मी एक प्रकल्प मिस केला होता. परंतु मी खूप आनंदी आणि आभारी आहे की मला ही दुसरी संधी मिळाली. आपल्या या प्रेमाबद्दल व आशीर्वादांबद्दल धन्यवाद.”

https://www.instagram.com/p/CJQ4MLzh8kG/

शाहरुखनंतर रमजानला उर्वशीच माहित आहे
इजिप्शियन अभिनेता मोहम्मद रामजान म्हणतो की तो बॉलिवूडमध्ये शाहरुख खान नंतर फक्त उर्वशी रौतेला हिला ओळखतो. त्याने उर्वशीचं या शब्दात कौतुक केलं की, “उर्वशी ही बॉलिवूडची तरूण सुपरस्टार आहे, तिची प्रसिद्धी आश्चर्यकारक आहे. ती भारतीय सौंदर्याचे एक उदाहरण आहे. मला खात्री आहे की आपण लवकरच तिला हॉलिवूडचं प्रोजेक्ट करताना पहाल. उर्वशीसोबत फेब्रुवारीपासून आमच्या प्रोजेक्टबद्दल संभाषण चालूच होतं. परंतु कोरोना महामारी हा आमच्या प्रवासात वेगवान ब्रेकर बनला. उर्वशीबरोबर काम केल्याने मला खूप आनंद झाला आहे.”

https://www.instagram.com/p/CJQ0CvphZB-/

यावरून आपल्याला काळालंच असले की उर्वशीची लोकप्रियता कोणत्या लेव्हलला पोहोचली आहे. उर्वशीने बॉलिवूडमध्ये ग्रेट ग्रँड मस्ती, पागलपंती, हेट स्टोरी ४, सनम रे, व्हर्जिन भानुप्रिया या सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

हे देखील वाचा