Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये? अंगावरील ‘ते’ निशाण पाहून उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया!

उर्वशी रौतेला रिलेशनशिपमध्ये? अंगावरील ‘ते’ निशाण पाहून उंचावल्या नेटकऱ्यांच्या भुवया!

अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या मेकअप आणि आउटफिटमुळे चर्चेत असते. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती चर्चेत येण्याचे कारण आउटफिट नाही, तर वेगळेच काहीतरी आहे. खरं तर, उर्वशीच्या मानेवर एक खूण दिसली आहे. हे पाहून ते लव्ह बाईट आहे की काय असा अंदाज चाहते लावत आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असते अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते, जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडते. याशिवाय, जेव्हा अभिनेत्री बाहेर दिसते, तेव्हाही ती कॅमेऱ्यासमोर जबरदस्त पोझ देताना दिसते. तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. यावेळीही असेच काहीसे घडले. पण यावेळी ती प्रसिद्धीझोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा आउटफिट किंवा तिचा बोल्डनेस नाही. तर तिच्या मानेवर एक ‘लव्ह बाईट’ सारखी खूण दिसली. ते पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आणि यासोबतच ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत ​​आहेत. (urvashi rautela love bite is so visible from far video gone viral)

‘त्या’ निशाणाने वेधले लक्ष
उर्वशी रौतेलाचा हा लेटेस्ट व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती ग्लिटर टॉप आणि शॉर्ट स्कर्टमध्ये एअरपोर्ट लुकमध्ये दिसत आहे. लाल आणि काळ्या कॉम्बिनेशनमध्ये तिचा लूक किलर दिसत आहे. यासोबत तिने पोनी टेल हेअरस्टाईल केली आहे आणि गॉगल घातला आहे. तिचा हा एअरपोर्ट लुक अप्रतिम दिसत आहे. यादरम्यान, अभिनेत्रीला पाहताच पॅपाराझी तिला घेरतात आणि तिचे फोटो काढू लागतात. पण याच दरम्यान उर्वशीने मान वळवली, तेव्हा तिच्यावर दिसणारी खूण पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खरं तर, नेटकऱ्यांची अशी प्रतिक्रिया होती की तिच्या मानेवर ‘लव्ह बाइट’ दिसत आहे. यानंतर युजर्सने अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंट करायला सुरुवात केली.

नात्याबद्दल नेहमी पाळते मौन
आत्तापर्यंत उर्वशीने तिच्या नात्याबद्दल किंवा लव्ह लाईफबद्दल कधीही बोलले नाही. पण तिच्या मानेवरील या खुणा पाहून चाहत्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न येऊ लागले आहेत की, ती कुणाला डेट करत आहे का? जर होय, तर तो भाग्यवान कोण आहे? याशिवाय अभिनेत्री त्याच्यासोबत कधीपासून रिलेशनशिपमध्ये आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे चाहते शोधत आहेत. मात्र, अभिनेत्रीच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

उर्वशीचे वर्कफ्रंट
उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती पहिल्यांदा ‘सिंग साहब द ग्रेट’ चित्रपटात दिसली होती. मात्र, ती आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकली नाही. पण तिचे आयटम नंबर प्रेक्षकांकडून खूप पसंत केले जातात. अभिनेत्री येत्या काही दिवसांत ‘ब्लॅक रोझ’ आणि ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा