Wednesday, July 3, 2024

कोट्यवधी संपत्तीची मालकीण असणारी उर्वशी फिरत होती स्कूटीवरून, पोलिसांनी पकडल्यावर केलं ‘हे’ काम

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांच्या चाहत्यांकडून अशा व्हिडिओंना जोरदार प्रतिसाद मिळतो. अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती स्कूटी चालवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या घायाळ करणार्‍या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगलेली आपल्याला पाहायला मिळते. कधी महागड्या ड्रेसमुळे, तर कधी महागड्या दागिन्यांमुळे ती सतत चर्चेत असते. मात्र, यावेळी उर्वशी तिच्या साधेपणामुळे सगळीकडे चर्चेचा विषय ठरली आहे. ती आपल्या महागड्या गाड्या सोडून स्कूटीवर फिरतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिनेत्री उर्वशी रौतेला एका स्कूटीवर फिरताना दिसत आहे. करोडोंचे ड्रेस घालणारी, महागड्या गाड्या वापरणारी उर्वशी साध्या स्कूटीवर फिरत आहे. हाच सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. या राईड दरम्यान उर्वशीला एक वाहतूक पोलीस लायसन्स मागतात, त्यावेळी पहिल्यांदा उर्वशी घाबरते आणि नंतर सगळे कागदपत्रे दाखवत हसत हसत निघून जाते. हा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे.

मात्र, हा व्हायरल व्हिडिओ उर्वशीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर गेल्या वर्षी ठेवला होता. आता तोच व्हिडिओ पुन्हा तिच्या चाहत्यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजच्या दरम्यानचा आहे. यामध्ये ती रणदीप हुड्डासोबत झळकणार आहे.

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या नवनवीन गाण्यांमध्ये आपला जलवा दाखवताना दिसत आहे. लवकरच ती जिओ स्टुडिओच्या ‘इंस्पेक्टर अविनाश’ या वेबसीरिजमध्ये काम करताना दिसणार आहे. त्याचबरोबर ती दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा पदार्पण करणार आहे. तिचा हा चित्रपट बिग बजेट चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा