Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

उर्वशी रौतेला पोहोचली गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात, पूजा करून घेतले देवीचे दर्शन

अभिनेत्री उर्वशी रौतेला केवळ तिच्या चित्रपटांसाठीच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही खूप चर्चेत असते. ती स्वतःशी संबंधित माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता उर्वशी रौतेलाने फोटो शेअर करत तिने कामाख्या मातेचे दर्शन घेतल्याची माहिती दिली.

उर्वशीने तिच्या कामातून स्वत:साठी काही वेळ काढला आणि आसाममधील गुवाहाटी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिरात भावनिक तीर्थयात्रा करण्याचा निर्णय घेतला. नवीन वर्षाच्या आधी आशीर्वाद घेण्यासाठी आणि विधी करण्यासाठी अभिनेत्रीने पवित्र मंदिराला भेट दिली.

कामाख्या मंदिर हे भारतातील सर्वात पूजनीय आणि प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. उर्वशी नेहमीच अध्यात्मिक राहिली आहे आणि ती अनेकदा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरांना भेट देते. कामाख्या मंदिरातून आशीर्वाद घेतल्यानंतर उर्वशीने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. पारंपारिक पोशाख परिधान करून, ती प्रार्थनेत ध्यान करत होती आणि आगामी वर्षासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी पूजा विधी करत होती.

यावेळी उर्वशी पारंपरिक पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. यासोबत तिने लाल रंगाची कामाख्या माता चुन्नी घातली होती. उर्वशीने मोकळे केस आणि गडद मेकअपने तिचा लूक पूर्ण केला. या लूकमध्ये उर्वशी खूपच सुंदर दिसत होती. येणारे नवीन वर्ष आणि त्यांच्या कारकिर्दीला यश मिळो यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अल्लू अर्जुनने ‘पुष्पा 2’ मध्ये दारू आणि पान ब्रँडची जाहिरात करण्यास दिला नकार, नाकारली करोडोंची ऑफर
शाहरुख खानपेक्षा प्रभास घेतो जास्त फी, जाणून घ्या ‘डंकी’ आणि ‘सालार’च्या दिग्गजांनी किती घेतली फी

हे देखील वाचा