Wednesday, July 2, 2025
Home बॉलीवूड बापरे बाप!! उर्वशी रौतेलाने फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर घातला होता ‘इतक्या’ लाखांचा ड्रेस, किंमत वाचून डोळेच फिरतील

बापरे बाप!! उर्वशी रौतेलाने फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर घातला होता ‘इतक्या’ लाखांचा ड्रेस, किंमत वाचून डोळेच फिरतील

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ही तिच्या फॅशन आणि स्टाईलने नेहमीच सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनते. तसेच सोशल मीडियावर देखील ती नेहमीच सक्रिय असते. सध्या सोशल मीडियावर तिच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा चालू आहे. नुकतेच उर्वशीने फिल्मफेअर अवॉर्ड फंक्शनमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान तिने रेड कार्पेटवर वॉक केला होता. अभिनेत्रीचा हा लूक फॅशन क्रिटिक्सला खूपच आवडला. या अवॉर्ड फंक्शनमध्ये तिला बेस्ट ड्रेसचा अवॉर्ड देखील दिला.

उर्वशीने नुकतेच अवॉर्ड फंक्शनमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मरून कलरचा गाऊन घातला आहे. या ड्रेससोबत तिने ज्वेलरी घातली आहे. हातात ब्रेसलेट, रिंग्ज आणि हिऱ्यांचा डिझाईन केलेला क्लच हातात घेऊन फोटो काढले आहेत. तिच्या या पूर्ण लूकची किंमत 35 लाख एवढी आहे.

तिच्या या ड्रेसची आणि लूकची चर्चा सर्वत्र चालू आहे. तिने शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होताना दिसत आहेत.

उर्वशीचे नुकतेच ‘एक लडकी भिगी भागी सी’ हे गाने रिलीझ झाले आहे. ती सध्या तिच्या ‘ब्लॅक रोज’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा तिचा पहिला द्विभाषिक चित्रपट आहे. जो दिग्गज साहित्यकार शेक्सपिअर यांच्या ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकावर आधारित आहे.

याआधी तिचा ‘व्हर्जिन भानुप्रिया’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ झाला होता. यासोबतच तिचे ‘ओ चांद कहा से लाओगी’ हे व्हिडिओ साँग रिलीझ झाले आहे. यामध्ये ती टीव्ही स्टार मोहसीन खान याच्यासोबत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मोबाईलच्या दुकानाला सोनू सूदचं नाव, ‘१०० रुपयांचा रिचार्ज मिळेल का?’ म्हणत अभिनेत्याचा मजेशीर अंदाजात प्रतिसाद

-‘सगळं ठीक तर आहे ना?’ म्हणत सुष्मिताच्या भावनिक पोस्टवर चाहत्यांची प्रतिक्रिया

-व्हिडिओ! ‘कुछ तो है’ मालिकेच्या सेटवरही दिसली होळीची मस्ती, अभिनेत्री कृष्णा मुखर्जीकडून मजेशीर व्हिडिओ शेअर

हे देखील वाचा