Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘डूब गये’ गाण्यावर स्लो मोशनमध्ये रोमँटिक अंदाज, पाहून प्रेमातच पडाल

बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. परंतु आज बॉलिवूडमध्ये‌ तिने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. तिच्या चित्रपटातील अभिनयामुळे किंवा व्हिडिओमुळे ती‌ नेहमीच चर्चेत असते. या व्यतिरिक्त ती तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजामुळे चर्चेत असते. नुकताच तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर धमाल करत आहे. यात व्हिडिओमध्ये ती तिच्या ‘डूब गये’ या गाण्यावर स्लो मोशनमध्ये वाळूवर रोमँटिक अंदाजात धावताना दिसत आहे. हे पाहून तुम्हीही प्रेमात पडाल.

उर्वशीने हा व्हिडिओ तिचा अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘डूब गये’ गाण्यावर रोमँटिक अंदाजात दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. उर्वशीच्या या स्टायलिश व्हिडिओला‌ 13 लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज आले आहेत.

नेहमी प्रमाणेच तिचे चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहे. तिचा वाळूमध्ये स्लो मोशन केलेला हा डान्स सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. तिचे चाहते तिच्या सौंदर्या सोबत तिच्या डान्सचे देखील कौतुक करत आहेत.

उर्वशी रौतेलाच्या आगामी प्रोजेक्ट बद्दल बोलायचे झाल्यास, ती ‘ब्लॅक रोज’, ‘थ्रीतूत्तु पायले 2’ आणि वेब सीरिज ‘इन्स्पेक्टर अविनाश’ यामध्ये दिसणार आहे. तिचा ‘व्हर्जिन- भानुप्रिया’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. उर्वशी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे 36 मिलियन पेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. उर्वशी ही तिच्या अनेक डान्स व्हिडिओमुळे देखील खूप चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये तिने अभिनयापेक्षा अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये डान्स केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: कोरोनाच्या वेदनादायक वातावरणात अभिनेत्री प्रिया मराठेने शेअर केली मनोबल वाढवणारी पोस्ट! 

-बधाई हो! सनी लिओनीच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिल्या खास टिप्स

-काळीज तोडणारी बातमी! अभिनेत्री स्नेहा वाघच्या वडिलांचे निधन, पोस्ट शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा