Thursday, March 28, 2024

बधाई हो! सनी लिओनीच्या सुखी संसाराला १० वर्षे पूर्ण, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना दिल्या खास टिप्स

बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात आपलं नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनी तिच्या अभिनया‌सोबतच तिच्या डान्सने देखील सर्वत्र प्रसिद्ध आहे. सोबतच सनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या कुुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. आता देखील सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये तिने खास टिप्सही दिल्या आहेत. यामध्ये तिने सांगितले आहे की, तिच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत.

सनी लिओनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती सांगत आहे की, “तुमचं लग्न यशस्वी बनवण्यासाठी या पाच गोष्टी नक्की फॉलो करा. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एकमेकांसोबत गप्पा मारा. सोबत लेट नाईट डिनर प्लॅन बनवा. दोघांनी मिळून जेवण बनवा. एकमेकांना हसवा. एकमेकांचे नेहमी कौतुक करा.” या सगळ्या गोष्टी सांगत सनीने तिच्या पतीसोबत एक जबरदस्त डान्स केला आहे.

मागील काही दिवसांपासून सनी लिओनीच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमालीची वाढ झाली आहे. सोशल मीडियावर तिचे 4 कोटींपेक्षा देखील जास्त फॉलोवर्स‌ आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने निळ्या रंगाची जीन्स आणि पिवळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. तसेच तिच्या पतीने काळ्या रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली आहे.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘शेरो’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर 25 मार्चला प्रदर्शित झाला आहे. तिचा हा चित्रपट चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पत्नी सुगंधा मिश्राविषयी बोलताना संकेत भोसलेला अश्रू अनावर; बोलता बोलताच लागला रडू, पाहा भावुक व्हिडिओ

-‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा धर्मेंद्र आणि सनी देओलमध्ये होते भांडण; पाहून रितेश अन् जेनेलियाही लागले हसू

-प्रेम हे! विराट कोहलीने गायले होते पत्नी अनुष्का शर्मासाठी ‘हे’ गाणे, अभिनेत्रीचे डोळे आले होते भरून

हे देखील वाचा