महिलांच्या गर्भपातावर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घोषणेनंतर, अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. अमेरिकेबाहेरील लोक याविरोधात प्रतिक्रिया देत असले, तरी भारतीय सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अनेक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रींनी गर्भपात बेकायदेशीर असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, आता प्रियांका चोप्रानेही (Priyanka Chopra) यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राने गर्भपाताच्या निर्णयाबाबत थेट काहीही वक्तव्य केलं नाही, पण तिने अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांची एक पोस्ट तिच्या इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केली आहे. यामध्ये मिशेलने गर्भपाताच्या बेकायदेशीरतेवर टीका केली आहे आणि नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करत काही लिहिले नसले, तरी पण तिचे मौन तिचे मत व्यक्त करत आहे. (us abortion law priyanka chopra react on american abortion law)
याशिवाय प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, जी गर्भपातावर तिचे मत स्पष्ट करत आहे. प्रियांकाने शेअर केलेल्या कोलाज फोटोमध्ये एका बाजूला बंदूक आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘फ्री टू कॅरी’, दुसरा फोटो गर्भवती महिलेच्या बेबी बंपचा आहे, ज्यावर लिहिले आहे, “फोर्स टू कॅरी.” या पोस्टच्या वर एक कॅप्शन आहे, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निषेध करण्यात आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाचे दोन निकाल बदनाम राहतील.” महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेत नागरिकांना बंदूक बाळगण्याचा अधिकार आहे.
काय आहे गर्भपाताचा मुद्दा?
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने अमेरिकेतील महिलांचा गर्भपात बेकायदेशीर ठरवला आहे. २५ जून २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने ५० वर्षे जुन्या ‘रो विरुद्ध वेड’ प्रकरणात गर्भपात बेकायदेशीर घोषित केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा