×

प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. अनेकांना असे वाटते की, ते देखील चित्रपटाचा एक भाग बनून चंदेरी दुनियेत आपले नाव कमवु शकतील. पण प्रत्येकाचे हे स्वप्न पुर्ण होईलच असे नाही. प्रत्येकासाठी हे सोपे नाही. अनेकजण चित्रपट सृष्टीतील पदार्पण करतात. मात्र, काही काळानंतर त्यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवास थांबतो.

चित्रपटसृष्टीत अनेक लोकांनी असे नाव कमावले की, आज ही त्यांची ओळख जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर कोरलेली आहेत. परंतु या मागे अनेक गडद रहस्ये देखील लपलेली आहेत. मात्र, अनेक वेळा ही रहस्ये जगासमोर देखील आली आहेत.

रणवीर सिंगने वयाच्या १२ व्या वर्षी गमावले कौमार्य
बाॅलिवुडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग याची गणना आज टॉप अभिनेत्यांमध्ये केली जाते. ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातुन त्याने चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. रणवीरने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने वयाच्या १२ व्या वर्षी कौमार्य गमावले होते. काही वर्षांपूर्वी रणवीर सिंगने एका कंडोम जाहिरातीच्या प्रमोशन दरम्यान हे रहस्य उघडकीस आणले होते. (You will be surprised to read the ‘these’ secrets of the Bollywood world!)

View this post on Instagram

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

प्रियांका चोप्राकडे केली ही गलिच्छ मागणी
बाॅलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिचे ग्लॅमरस फोटो आणि चित्रपटसृष्टीतील तिच्या कारकिर्दीमुळे अनेक चाहत्याची मने जिंकली आहेत. लॉकडाऊन दरम्यान प्रियांका चोप्राने तिच्या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. या पुस्तकात तिने अनेक धक्कादायक खुलासे केले. तिने सांगितले होते की, एका दिग्दर्शकाने तिला शुटींग दरम्यान निवस्त्र होण्यास सांगितले होते.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

यात तिने लिहीले की, “दिग्दर्शकाने मला स्टायलिस्टशी बोलण्याची कल्पना दिली, म्हणून मी त्याला फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. त्यानंतर दिग्दर्शकाला मी परत फोन केला नाही. मग दिग्दर्शक म्हणाला की, चड्डी दिसली नाही, तर लोक चित्रपट बघायला कसे येतील?’

स्वरा भास्करसोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी?
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री कास्टिंग काउच्या बळी ठरल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर. तिने एका मुलाखतीत सांगितले की, तिला सुद्धा अनेकदा शारिरीक संबंधाविषयी विचारण्यात आले होते. ती म्हणाली, “मला बऱ्याचदा थेट विचारण्यात आले की ‘तुम्ही आणखी काय करू शकता?’ तेव्हा मी त्यांना उत्तर द्यायचे की, मी शारीरिक संबंध ठेवू शकत नाही.” तेव्हा यामुळे तिला अनेक चित्रपटात भुमिका देण्यासाठी नाकारण्यात आले होते.

View this post on Instagram

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

प्रियांका चोप्राने बाॅयफ्रेंडला पकडले रंगेहाथ
अभिनेत्री प्रियांका चोप्राचे नाव अनेक कलाकारांशी जोडले गेले आहे. पण एकदा ती अभिनेता हरमन बावेजाला डेट करत होती. दोघांनी ‘लव्ह स्टोरी २०५०’ मध्ये एकत्र काम केले होते.

View this post on Instagram

A post shared by Priyanka (@priyankachopra)

या दरम्यान, त्यांच्या संबंधित अनेक बातम्या व्हायरल होत होत्या. असे म्हटले जाते, की एकदा प्रियांकाने आफ्रिकेत शूटिंग करताना दोन महिलांसोबत हॉटेलमध्ये हरमनला लाल रंगेहाथ पकडले हो. त्यानंतर दोघे कायमचे वेगळे झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारा आडवाणीने शेअर केला वाढदिवसाचा लेट नाईट पार्टी व्हिडिओ; सिद्धार्थनेही लावली हजेरी

-जरीन खानने स्टायलिश लूकमध्ये दाखवला तिचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज

-सॉफ्टवेअर इंजिनिअर, मिस इंडिया अन् आज बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री; वाचा तापसी पन्नूचा रोचक सिनेप्रवास

Latest Post