Monday, June 17, 2024

‘तुझे बोलणे ऐकूण कानातून रक्त येते’, ट्रोलर्सची ही कमेंट पाहून अनन्या पांडेने ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान पुन्हा एकदा त्याचा टॉक शो घेऊन चाहत्यांसमोर आला आहे. अरबाज आजकाल त्याचा शो ‘पिंच २’ बद्दल बराच चर्चेत आहे. हा एक सेलिब्रिटी चॅट शो आहे, ज्यात बॉलिवूड सेलेब्स पाहुणे बनून सहभागी होतात. या शोमध्ये सेलेब्स सोशल मीडियावरील ट्रोल्सवर मोकळेपणाने उत्तर देतात. अनन्या पांडे अलीकडेच अरबाजच्या शोमध्ये सहभागी झाली होती.

अरबाज खान या शोमध्ये सोशल मीडिया अकाऊंट्सवर केलेल्या काही खास कमेंट्स उचलतो आणि कलाकारांना विचारून त्याचे उत्तर मागतो. यावेळी अनन्या पांडे या शोमध्ये पाहुणी बनली आहे. या दरम्यान, अनन्याने सर्व उत्तरे नि:संकोचपणे दिली आहेत. (user asked ananya pandey why dont you get married actress gave a very shocking answer)

लग्नाबद्दल केले मत व्यक्त
अनन्याची प्ले कार्डमध्ये ट्रोलची कमेंट आहे की, अनन्याचे बोलणे ऐकून कानातून रक्त येते. यावर अनन्या तिच्या अंदाजात उत्तर देत म्हणते की, “मी खूप दु: खी आहे, मी तुमच्यासाठी टिशू पेपर पाठवते.” यानंतर, अरबाज खान पुढची कमेंट वाचतो, “स्ट्रगलिंग दीदी की जय हो.” यावर अनन्या आश्चर्यचकित होऊन विचारते, की लोक तिला स्ट्रगलिंग दीदी का म्हणतात, हे खूप मजेदार आहे.

अनन्या प्रोमोमध्ये असे म्हणताना दिसत आहे, की जेव्हा एखाद्यामध्ये इतका द्वेष असतो, इतके विष असते. तेव्हा त्याचे उत्तर प्रेमाने द्यावे. एका कमेंटमध्ये अभिनेत्रीला फेक पांडे म्हटले गेले. ज्यावर ती म्हणते, की “तु्म्हाला माझ्याबद्दल सर्व गोष्टी माहित नाहीत, पण मी अजिबात नकली नाही.” एकाने अनन्याला विचारले, की तिचे लग्न का होत नाही? यावर अभिनेत्री मोठ्याने म्हणते, “30 व्या वर्षात विचारा, आता नाही.”

अनन्या पांडे ही अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने बॉलिवूडमध्ये करियरची सुरुवात करण जोहर निर्मित ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून केली होती. यानंतर ती ‘पती पत्नी और वो’ आणि ‘खाली पीली’मध्ये दिसली. आता अनन्या लवकरच शकुन बत्रा दिग्दर्शित ‘लायगर’ चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती विजय देवरकोंडासोबत महत्वाची भुमिका साकारणार आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

तृतीयपंथीयांवर केलेला विनोद कॉमेडियन, अभिनेता असलेल्या वीर दासच्या आला अंगाशी, सोशल मीडियावर मागावी लागली माफी

अरे बापरे! भारती सिंगने भर शोमध्ये ‘या’ स्पर्धकाच्या वडिलांना केले ‘किस’, आईची या प्रकरणावर ‘ही’ होती रिऍक्शन

बॉलिवूडमध्ये यशाचे समीकरण बदलावणारी दिग्दर्शक अभिनेता जोडी, म्हणजे डेव्हिड धवन आणि गोविंदा

हे देखील वाचा