Wednesday, July 3, 2024

अबब! चक्क ‘इतका’ महागडा ड्रेस घालून वाणी कपूर पोहचली ‘बेलबॉटम’ सिनेमाच्या प्रमोशनला

काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारचा बहूचर्चित आणि बहुप्रतीक्षित सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षयचा हा सिनेमा बऱ्याच दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. अखेर या सिनेमाचा ट्रेलर आला आणि त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. येत्या १९ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, त्याचे प्रमोशन सुरु झाले आहे.

‘बेलबॉटम’मधील सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री वाणी कपूरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटाच्या एका प्रमोशन कार्यक्रमात वाणीने घातलेल्या ड्रेसमुळे ती सध्या चर्चेचा विषय बनली आहे. वाणीचा हा गुलाबी रंगाचा सिक्वेन्स वर्क असणारा कुर्ता अनिता डोंगरे या प्रसिद्ध फॅशन डिझायनरने डिझाइन केला आहे. या ड्रेसची किंमत ऐकून तुमचे डोळे नक्कीच मोठे होणार आहे. वाणीने घातलेल्या या कुर्ता सेटची किंमत तब्बल १.५ लाख रुपये आहे.

वाणी या ड्रेसमध्ये अतिसुंदर दिसत असून, तिचा हा ड्रेस देखील खूप आकर्षक आहे. या प्लंजिंग नेकलाइन असलेल्या कुर्त्यावर गोटा-पट्टी एम्ब्रॉयड्री केलेली असून वरच्या बाजूला जरदोजी काम केले आहे. सोबतच तिने गुलाबी रंगाचाच पायजमा आणि दुपट्टा कॅरी केला आहे. त्यावर सिल्वर रंगाचे जरदोजी एंबोयड्री केली आहे. ती या ड्रेसमध्ये खूपच स्टनिंग आणि स्टायलिश दिसत होती.

या ड्रेससोबत तिने सिल्वर रंगाची चप्पल घातली असून, या ड्रेसवर तिने अतिशय साधा तरीही लक्षवेधी Dewy base मेकअप केला आहे. ज्यात तिने स्मोकी आईज, न्यूड लिपस्टिक लावली असून, तिने सिल्वर रंगाची लावलेली टिकली तिचा लुकला चार चाँद लावत होती.

या ड्रेसमधला वाणीचा फोटो अनिता डोंगरेने तिच्या वेसाईट्वर टाकला आहे. तिच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही हा ड्रेस पाहू शकता. या वेबसाइटवर ड्रेसची किंमत १.७ लाख रुपये इतकी आहे. किंमत कितीही असली, तरी कुर्ता सेट खूपच सुंदर आहे.

बेलबॉटम या चित्रपटात वाणीने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली असून, अक्षय यात एका एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे. तर लारा दत्ता यात पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा