Monday, July 1, 2024

गणेशोत्सवाच्या ‘त्या’ नियमावर वैभव मांगलेंनी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाले…

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात आगामी गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सर्वांना आता आतुरता लागली आहे ती गणपतीच्या अगमणाची. सर्वजण गणेशोत्स जोरदार साजरा केला जातो. आता काही दिवस बाकी राहीले आहेत गणपतीच्या अगमणाची. लहान मुलांपासून ते जेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वच जण गणपतीची आतुरतेने वाट पाहतात. गणेशोत्सवा निमित्त अनेक कार्यक्रम साजरे केले जातात. रात्री उशीरा पर्यंत डिजे लावून मुल मुली नाचत असतात. पण काही दिवसांपासून यावर बंदी घातली आहे. यावर प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी भाष्य केले आहे.

या वर्षी पुण्यात गणेशोत्सवात रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निर्णय पुणे जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यंदा पाचव्या दिवशी गौरी गणपती विसर्जन होणार आहे. यावेळी खूप कमी दिवस आहेत. तसेच पुण्यात पाच दिवसांची परवानगी दिली आहे. पण मुंबईवर मात्र अन्याय करण्यात आला आहे.

यावरून वैभव मांगले(Vaibhav Mangle) यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियार चांगलीच व्हायरल होत आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, “हे काय चाललंय काय ??…आणि मग सवाई महोत्सवाला 10 वाजे पर्यंतच का ?” वैभव मांगले सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते त्यांच मत सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by vaibhav mangale (@vaibhavmangale)

वैभव मांगले यांनी केलेल्या या पोस्टवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “कधीकधी वाटतं आपण खरंच स्वतंत्र झालोत का?” तर दुसऱ्या नेटकऱ्यांनी लिहिले की, “निव्वळ मूर्खपणा…” तर आणखी एकाने लिहिले की,’सर, आपण नुसत सहन करायचं…’ (Vaibhav Mangale post on that rule of Ganeshotsav is in discussion)

अधिक वाचा- 
लग्नानंतर 15 दिवसातच सॅम बॉंबेला खायला लागली होती जेलची हवा, पत्नी पूनम पांडेने केले होता हा गंभीर आरोप
‘कहानी घर घर की’मधून करिअरची सुरुवात, ‘या’ शोने बदलले आमिर अली मलिकचे आयुष्य

हे देखील वाचा